Honor 200 Lite झाला सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट, लवकर घेऊ शकतो मार्केटमध्ये एंट्री

ऑनर ब्रँड भारतीय बाजारात हळूहळू आपले पाय पसरत आहे तसेच प्रोडक्ट पोर्टफोलियोला वाढवत आहे. Honor 90 आणि Honor X9b भारतात लाँच झाले आहेत तसेच आता बातमी येत आहे की कंपनी Honor 200 Lite नावाने पण नवीन फोन बनवित आहे. हा नवीन स्मार्टफोन एनबीटीसी सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे जिथे ऑनर 200 लाईटचे अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Honor 200 Lite सर्टिफिकेशनची माहिती

ऑनर 200 लाइटने थायलंडचे एनबीटीसी सर्टिफिकेशन मिळवले आहे. या वेबसाईटवर फोनला LLY-AN00 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आले आहे, ज्यासोबत फोनचे नाव ‘Honor 200 Lite‘ पण लिहिले आहे. लिस्टिंगमध्ये फोनचे स्पेसिफिकेशन सांगण्यात आलेले नाहीत, परंतु हे सर्टिफिकेशन समोर आल्यानंतर बोलले जात आहे की कंपनी लवकरच Honor 200 Lite स्मार्टफोनला जागतिक मार्केटमध्ये लाँच करू शकते.

Honor 200 Lite स्पेसिफिकेशन (लीक)

  • 6.7″ 90 हर्ट्झ ओएलईडी डिस्प्ले
  • मीडियाटेक डाइमेंसिटी 6080 प्रोसेसर
  • 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज
  • 108 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
  • 35 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले : ऑनर 200 लाईट स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे, ज्यावर 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळू शकतो.

परफॉर्मन्स : लीक्सनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच केला जाईल जो मॅजिक ओएसवर काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.

मेमरी : Honor 200 Lite स्मार्टफोनमध्ये 12 जीबी पर्यंतची रॅम दिली जाऊ शकते ज्याची 8 जीबी एक्सटेंडड रॅम पण मिळेल. फिजिकल रॅम आणि वचुर्अल रॅम मिळून याला 20 जीबी रॅमची ताकद प्रदान करेल. तसेच मोबाईलमध्ये 512 जीबी पर्यंतचे स्टोरेज दिले जाऊ शकते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी या ऑनर फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीकनुसार हा मोबाईल 108 मेगापिक्सल मेन सेन्सरला सपोर्ट करेल, ज्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाईल. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर पाहायला मिळू शकतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Honor 200 Lite ला 5,000 एमएएच बॅटरीसह बाजारात आणले जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 35 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पाहायला मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here