Airtel 5G Launch: Airtel 5G साठी विकत घ्यावं लागणार का नवीन SIM Card? कंपनीनं दिलं उत्तर

airtel 5g launch in india before mukesh ambani jio 5g

Airtel 5G Service Launch India: देशात 5G नेटवर्कची चाहूल लागली आहे. देशातील ग्राहक नव्या पिढीच्या नेटवर्कसाठी उत्सुक आहेत परंतु तितकेच प्रश्न देखील त्यांच्या मनात आहेत. आता देशातील मोठ्या टेलीकॉम कंपन्यांपैकी एक Bharti Airtel नं ग्राहकांच्या अशाच एका प्रश्नाचं उत्तरं दिलं आहे. तसेच कंपनीनं 5G सर्व्हिसच्या लाँचची टाइमलाइन देखील सांगितली आहे.

5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर 5G सर्व्हिस (5G Service in India) च्या प्रतीक्षेत असलेल्या Airtel Users ची प्रतीक्षा संपणार आहे . मीडिया रिपोर्ट्सनुसार भारती एयरटेल (Bharti Airtel) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोपाल विट्टल (Gopal Vittal) यांनी माहिती देत सांगितलं आहे की भारती एयरटेल डिसेंबर 2022 पर्यंत देशातील महानगरांमध्ये 5जी सर्व्हिस लाँच (5G Service Launch in India) केली जाईल. त्यांनी 5G आल्यानंतर नवीन 5G सिम घेण्याची गरज आणि आपल्या शहरातील 5जी सर्व्हिसचं स्टेटस चेक करण्याची पद्धत सांगितली आहे.

Airtel 5जी सर्व्हिस लाँच टाइमलाइन

कंपनीचे CEO Gopal Vittal ने 5जी सर्व्हिसबाबत माहिती देत सांगितलं आहे की कंपनी लवकरच देशात 5जी सर्व्हिस लाँच करू शकते. त्यानंतर देशातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई इत्यादी शहरांमध्ये 5जी सर्व्हिस डिसेंबर 2022 पर्यंत लाँच करण्याची योजना आहे. त्यानंतर या सेवेचा विस्तार संपूर्ण देशात वेगानं करण्याची कंपनीची योजना आहे. त्यानंतर साल 2023 च्या अखेरपर्यंत देशातील शहरी भागांत 5जी सर्व्हिस लाँच होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

Airtel 5G साठी घ्यावं लागेल का नवीन SIM Card?

एयरटेल 5जी सर्व्हिस लाँच टाइमलाइनची माहिती देत Gopal Vittal यांनी सांगितलं की तुमच्या एयरटेल सिममध्ये आधीपासून 5G क्षमता आहे. त्यामुळे तुम्हाला 5जी स्मार्टफोनवर सहज Airtel चं जुनं सिम वापरता येईल. 5जी सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनच्या नेटवर्क सेंटिंगमध्ये जाऊन 4जी किंवा LTE व्यतिरिक्त 5जी ची निवड करा आणि 5जी सर्व्हिसचा आनंद घ्या.

त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की एक वर्षांपेक्षा जुन्या बऱ्याच स्मार्टफोन्समध्ये 5G चिपसेट नाही. परंतु, आता भारतात आलेले बरेचशे नवीन स्मार्टफोन 5G सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल त्याची 5G क्षमता तपासून घ्या. हे देखील वाचा: ठरलं तर! OnePlus टक्कर देण्यासाठी येणार realme GT NEO 3T 5G Phone; सुसाट चार्जींगसह फ्लॅगशिप प्रोसेसर

4जीच्या तुलनेत 30 पट जास्त वेग

एयरटेल कंपनीचे सीईओनीं सांगितलं की एयरटेल 5जी सर्व्हिसचा स्पीड खूप जास्त असेल. तसेच त्यांनी सांगितलं की Airtel 4G च्या तुलनेत 20 ते 30 पट Airtel 5G की स्पीड मिळेल. या स्पीडवर ग्राहक आवश्यक फाईल त्वरित डाउनलोड करू शकतील. हे देखील वाचा: 43 इंचाच्या OnePlus Y1S स्मार्ट टीव्हीवर 7,000 रुपयांची सूट; घरातच मिळवा थिएटरचा फील

शहरातील 5G स्टेटस

कंपनीनं आपल्या ग्राहकांना एयरटेल थँक्स अ‍ॅप (Airtel Thanks App) च्या माध्यमातून त्यांच्या शहरातील 5जी सर्व्हिसच्या स्टेटस चेक करण्याची माहिती देत आहे. कंपनीची योजना देशातील दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई इत्यादी मोठ्या शहरांमध्ये 5जी सर्व्हिस डिसेंबर 2022 पर्यंत लाँच करण्याची योजना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here