Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन

Honor

Huawei चा सब ब्रँड लवकरच आपल्या Honor 50 सीरीजच्या स्मार्टफोनद्वारे मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास तयार आहे. ऑनरचा हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नवीन Snapdragon चिपसेटसह 5G कनेक्टिविटी ऑफर करेल. ऑनरच्या आगामी स्मार्टफोन Honor 50 स्मार्टफोनबाबत जास्त लीक आणि रूमर्स उपलब्ध नाहीत. हुवावेपासून वेगळी झाल्यानंतर ऑनरचा हा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. बोलले जात आहे कि ऑनरच्या या स्मार्टफोन सीरीजचे तीन स्मार्टफोन Honor 50, Honor 50 Pro, आणि Honor 50 Pro+ सादर केले जाऊ शकतात. नवीन लीक रिपोर्ट्सनुसार या सीरीजचा बेस वेरिएंट Honor 50 स्मार्टफोन Snapdragon 775G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. (Honor 50 may first smartphone with Snapdragon 775G SOC)

Honor 50 स्पेसिफिकेशन्स

ऑनरच्या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल सोशल मीडिया अकाउंट Weibo वर युजर @DCS ने दावा केला आहे कि हा स्मार्टफोन Qualcomm च्या अंडर डेवलवप चिपसेट Snapdragon SM7325 म्हणजे Snapdragon 775G प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. क्वालकॉमचा हा चिपसेट 5G मॉडेमसोबतच Snapdragon 780G सह कमी पावरफुल प्रोसेसर असलेला स्मार्टफोन असेल.

हे देखील वाचा : Snapdragon 888 सह येणाऱ्या बेस्ट फोनची संपूर्ण यादी, बघा कोणता आहे तुमच्या योग्य

Honor 50 सीरीजबद्दल बोलले जात आहे कि ऑनरचा हा स्मार्टफोन यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत सादर केला जाऊ शकतो जो तीन वेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो. Honor 50 स्मार्टफोन मिड रेंज स्मार्टफोन असेल जो कंपनी Snapdragon 775G प्रोसेसरसह सादर करेल. बोलले जात आहे कि या सीरीजचा हायएन्ड स्मार्टफोन Honor 50 Pro+ Snapdragon 888 SoC सह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : LeEco करेल धमाकेदार पुनरागमन, लवकरच लॉन्च करेल दमदार LeTV Super Phone स्मार्टफोन

Honor V40

ऑनरच्या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल अफवा आहे कि कंपनी जूनच्या सुरुवातीला Honor V40 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. ऑनरच्या या स्मार्टफोनला अलीकडेच 3C सर्टिफिकेशन मिळाले आहे. 3C लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनचे चार्जिंग डिटेल समोर आले आहेत. या लिस्टिंगनुसार Honor V40 स्मार्टफोन 100W चार्जिंग स्पीडसह सादर केला जाऊ शकतो. Honor 50 Pro+ स्मार्टफोनने दुसऱ्या लीक रिपोर्टमध्ये दावा केला आहे कि या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्राइमेरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. या स्मार्टफोनचा कॅमेरा मॉड्यूल Huawei P50 सीरीज सारखा असू शकतो. सध्या ऑनरने या स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती ऑफिशियली शेयर केली नाही.

Honor चिपसेट बनवणाऱ्या कंपनी Qualcomm सह मिळून काम करत आहे. त्याचबरोबर बोलले जात आहे कि Honor 50 सीरीजचे स्मार्टफोन्स Google services सह सादर केले जाऊ शकतात. चायनीज स्मार्टफोन कंपनी ऑनरने हुवावेपासून वेगळे झाल्यानंतर कोणताही दमदार स्मार्टफोन लॉन्च केला नाही. बोलले जात आहे कि स्मार्टफोनची नवीन सीरीज ऑनरला पुन्हा स्मार्टफोन गेममध्ये घेऊन येऊ शकते. कंपनी लवकरच मार्केटमध्ये Honor Play 5 स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here