22 मे ला आॅनर लॉन्च करणार आहे नवीन स्मार्टफोन, आॅनर 7सी नावाने होऊ शकतो लॉन्च

टेक कंपनी आॅनर आज खुप प्रतीक्षेनंतर आपला स्टाईलिश फ्लॅगशिप स्मार्टफोन आॅनर 10 चा ग्लोबल लॉन्च केला आहे. ग्लोबल लॉन्च सह हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पण अनाउंस केला आहे जो आगामी काळात सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर फॅन्स चा आनंद दुप्पट करत कंपनी ने अजून एका नवीन स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. आॅनर ने सांगितले की कंपनी येणार्‍या 22 मे ला देशात अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आॅनर इंडिया ने आॅफिशियल फेसबुक पेज वर पोस्ट मधून ईशारा केला आहे की हा आगामी स्मार्टफोन आॅनर 7 सीरीज अंतर्गत लॉन्च होईल.

आॅनर इंडिया ने घोषणा केली आहे की कंपनी येणार्‍या 22 मे ला भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी ने फोन चे नाव सांगितले नाही पण अंदाज लावला जात आहे की आॅनर द्वारा लॉन्च केला जाणारा हा स्मार्टफोन आॅनर 7सी असेल. भारतात हा फोन कधी सेल साठी उपलब्ध होईल आणि या फोन ची किंमत काय असेल यासाठी कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल.

आॅनर 7सी के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स् बद्दल बोलायचे तर हा फोन ट्रेंड मधील 18:9 आस्पेक्ट रेशियो डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा फुलव्यू डिसप्ले आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन ईएमयूआई 8.0 आधारित एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर झाला आहे आणि 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी कडून आॅनर 7सी चे दोन वेरिएंट सादर करण्यात आले आहेत ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर या फोन च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर सेल्फी साठी यात 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही सेटअप एलईडी फ्लॅश आहे.

आॅनर 7सी 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. आॅनर च्या या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर आहे आणि याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी आॅनर 7सी मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन ब्लॅक, गोल्ड, रेड आणि ब्लू कलर आॅप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. बघावे लागेल की भारतात आॅनर 7सी त्याच स्पेसिफिकेशन्स सह येतो की काही बदल होतो ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here