24 जुलैला भारतात लॉच होत आहे आॅनर 9एन, आकर्षक लुक सह आहेत दमदार स्पेसिफिकेशन्स

आॅनर ने मागच्या महिन्यात आपला पहिला बेजल लेस स्मार्टफोन आॅनर 9आय चा नवीन वर्जन आॅनर 9आय (2018) चीन मध्ये लॉन्च केला होता. काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स ने एक्सक्लूसिव बातमी दिली होती की आॅनर कंपनी लवकरच आपला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. आता आॅनर इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवून नवीन फोन च्या लॉन्च ला दुजोरा दिला आहे. आॅनर चा नवीन फोन आॅनर 9एन नावाने 24 जुलै ला भारतात लॉन्च होत आहे.

आॅनर इंडिया मीडिया इन्वाईट पाठवत आहे, ज्यात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे की कंपनी 24 जुलै ला भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि याच मंचावरून देशात नवीन आॅनर स्मार्टफोन लॉन्च करेल. आॅनर द्वारा हा स्मार्टफोन आॅनर 9एन नावाने भारतात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हाच स्मार्टफोन चीनी बाजारात आॅनर 9आय नावाने लॉन्च झाला आहे.

आॅनर 9एन म्हणजे आॅनर 9आय (2018) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे ज्याचा बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाला आहे. कंपनी ने हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सह सादर करण्यात आला आहे सोबत हा हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे सोबत ग्राफिक्स साठी माली टी830-एमपी2 जीपीयू आहे. आॅनर 9एक्स/आॅनर 9आय (2018) 64जीबी तसेच 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आॅनर 9एन/आॅनर 9आय (2018) डुअल सिम सह वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्निक ला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात आॅनर 9एन/आॅनर 9आय (2018) चा 64जीबी वेरिएंट 1,399 युआन (जवळपास 14,600) तसेच 128जीबी मेमरी वेरिएंट 1,699 युआन (जवळपास 17,800) च्या किंमतीत ब्लॅक, ब्लू, ग्रीन व पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. भारतात फोन ची किंमत किती असेल यासाठी 24 जुलै ची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here