48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आला Honor 9X Lite, जाणून घ्या किंमत

Honor ने यावर्षी जानेवारी मध्ये भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च केला होता. तर आता कंपनीने या डिवाइसचा छोटे वर्जन Honor 9X Lite फिनलँडच्या मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. डिवाइसचे फीचर्स थोडेफार Honor 8X सारखे आहेत. पण कंपनीने Honor 9X Lite 48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह सादर केला आहे.

फोन फिनलँड मध्ये दोन कलर ऑप्शन ब्लॅक आणि ग्रीन मध्ये सादर केला आहे. डिवाइसची किंमत पाहता उत्तर युरोपिय देशांत हा फोन €199 (जवळपास 16,510 रुपये) मध मिळत आहे. तसेच डिवाइस 30 एप्रिल पासून प्री-ऑर्डर साठी येईल. तसेच 14 एप्रिल पासून फोन विक्रीसाठी सादर केला जाईल.

डिजाइन

Honor 9X Lite च्या बॅक पॅनल बॅक पॅनल वर उजवीकडे रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यांच्या खाली फ्लॅश लाईट आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे 48MP AI Camera लिहिण्यात आले आहे. याव्यतिरिक्त फोनच्या फ्रंटला मोठी नॉच आहे.

स्पेसिफिकेशन्स

ऑनर 9एक्स लाइट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.5 इंचाच्या फुलव्यू डिस्प्ले वर बनला आहे जो 91 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करतो. Honor 9X Lite एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनला आहे जो ईएमयूआई 9.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये हुआवईचा किरीन 710 चिपसेट मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे जो आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल.

याव्यतिरिक्त फोन मध्ये 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या मागे f/1.8 अपर्चर सह 48MP एआई मेन सेंसर आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तर फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here