Honor ने सांगितले होते कि कंपनी आपली एक्स सीरीज वाढवणार असून 23 जुलैला दोन नवीन फोन लॉन्च करेल. आज कंपनीने अंर्तराष्ट्रीय मंचावर या स्मार्टफोन सीरीजका विस्तार केला आहे. Honor ने Honor 9X आणि Honor 9X Pro टेक मंचावर सादर केले आहेत. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन आज चीनी बाजारात आले आहेत जे आगामी काही दिवसांत भारतासमवेत देशातील इतर देशांत येतील. विशेष म्हणजे Honor 9X आणि Honor 9X Pro ब्रँडचे पहिले स्मार्टफोन आहेत जे पॉप-अप सेल्फी सह लॉन्च झाले आहेत.
लुक व डिजाईन
सर्वात आधी Honor 9X आणि Honor 9X Pro च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हे दोन्ही मॉडेल बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले सह सादर केले गेले आहेत. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Honor 9X आणि Honor 9X Pro च्या वरच्या पॅनल वर डावीकडून पॉप-अप सेल्फी कॅमेरा बाहेर येतो.
Honor 9X डुअल आणि Honor 9X Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप सोबतच 48MP AI Camera कॅमेरा लिहिण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगर प्रिंट सेंसर नाही. तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रँडिंग आहे. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आला आहे.
फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.
Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
Honor 9X चा सर्वात छोट्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 1399 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 14,000 रुपये आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 1599 युआन तर 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 1899 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार क्रमश: 16,000 रुपये आणि 19,000 रुपयांच्या आसपास आहे.
Honor 9X Pro ची किंमत पाहता फोनचा बेस वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या वेरिएंटची किंमत 2199 युआन म्हणजे जवळपास 22,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे फोनचा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 2399 युआन म्हणजे जवळपास 24,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हे दोन्ही फोन चीन मध्ये 30 जुलै पासून प्री-बुकिंग साठी उपलब्ध होतील.