12 मे ला भारतात लॉन्च होईल Honor 9X Pro, फोन मध्ये मिळेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी

Huawei ने गेल्या आठवड्यात माहिती दिली होती कि कंपनी आगामी काळात भारतात आपला नवीन फोन Huawei Y9s लॉन्च करणार आहे. हुआवईने फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवले आहेत आणि आता किंमतीची वाट बघितली जात आहे. तर दुसरीकडे हुआवईची सब-ब्रँड कंपनी Honor पण येत्या काही दिवसांत भारतात एक नवीन फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. ऑनर येत्या 12 मे ला भारतात आपला नवीन डिवाईस Honor 9X Pro लॉन्च करणार आहे.

Honor 9X Pro फेब्रुवारी मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आता 12 मे ला भारतीय बाजारात येईल. ऑनर 9एक्स प्रो च्या लॉन्च डेटची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे. एजेंसी नुसार 12 मे ला भारतात लॉन्च होणारा Honor 9X Pro कंपनी द्वारे शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकला जाईल. तसेच अंदाज लावला जात आहे कि Honor 9X Pro बाजारात 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो.

Honor 9X Pro

अंर्तराष्ट्रीय बाजारात हा बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनल वर डावीकडे आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रँडिंग आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

Honor 9X Pro चा चीनी मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केला गेला आहे जो 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी ऑनर 9एक्स प्रो मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X Pro च्या बॅक पॅनल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर आणि 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस पण आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Honor 9X Pro मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंगसाठी Honor 9X Pro साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी पण आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Honor 9X Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आशा आहे कि ऑनर 9एक्स प्रो भारतात पण याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाईल.

ऑनर 9एक्स प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here