7.09-इंचाच्या डिस्प्ले सह नवीन रेकॉर्ड करण्यासाठी येत आहे हा शानदार स्मार्टफोन, लवकरच होईल लॉन्च

Honor ने गेल्याच महिन्यात आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करत Honor X10 स्मार्टफोन लॉन्च केले होते. हा एक 5G फोन आहे जो मिडबजेट मध्ये लॉन्च झाला होता. पॉप-अप कॅमेरा आणि मोठ्या बॅटरी सह येणाऱ्या ऑनर एक्स10 5जी नंतर आता बातमी येत आहे कि हि कंपनी या सीरीज मध्ये अजून दोन नवीन फोन जोडण्याची तयारी करत आहे आणि हे डिवाईसेज Honor X10 Max तसेच Honor X10 Pro नावासह लॉन्च केला जाईल.

Honor X10 Max आणि Honor X10 Pro ची माहिती सध्या लीकच्या माध्यमातून समोर आली आहे तसेच कंपनी द्वारे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लीकनुसार हे दोन्ही स्मार्टफोन पण सर्वात आधी चीन मध्ये लॉन्च होतील नंतर दुसऱ्या बाजारांमध्ये येतील. यातील ऑनर एक्स10 मॅक्स बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 7.09 इंचाच्या मोठ्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. साधारणतः या स्क्रीन साईज वर स्मार्टफोन नाही तर टॅबलेट येतात. ऑनर एक्स10 प्रो मध्ये एक्स10 5जी एवढीच स्क्रीन मिळू शकते.

लीक्सनुसार Honor X10 Max कंपनी आधी मीडियाटेक डायमनसिटी 1000+ चिपसेट वर लॉन्च करण्याची योजना बनवत होती, पण आता चिपसेट स्टॉकच्या तुटवड्यामुळे हा फोन डायमनसिटी 800 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. आशा आहे कि हे दोन्ही स्मार्टफोन एक्स10 5जी प्रमाणे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केले जातील.

Honor X10

ऑनर एक्स10 बद्दल बोलायचे तर हा डिवाईस 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.63 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो मॅजिक यूआई 3.1.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसर सह हुआवईचा किरीन 820 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन ब्लू, ब्लॅक, सिल्वर आणि ऑरेंज कलर मध्ये लॉन्च केला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor X10 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 40 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX600 सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. त्याचबरोबर सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी ऑनर एक्स10 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Honor X10 डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी सोबत 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो.

सिक्योरिटीसाठी Honor X10 च्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,300एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. ऑनर एक्स10 च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 1899 युआन (जवळपास 20,000 रुपये), 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 2199 युआन (जवळपास 23,400 रुपये) तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 2399 युआन (जवळपास 25,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here