ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

Best Deals During Online Sale: सोमवार पासून नवरात्री सुरु होतील, त्यानंतर पुढील महिन्यात दसरा आणि दिवाळी येत आहे. या निमित्याने जवळपास सर्व ई-कॉमर्स साइट्सवर वार्षिक सेल सुरु होणार आहेत. ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart की सेल (Amazon Great Indian Festival and Flipkart Big Billion Days sale) देखील सुरु होणार आहे, ज्यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार डिस्काउंटसह प्रोडक्ट्सची विक्री केली जाईल. या फेस्टिव सीजन सेलमध्ये बेस्ट डील (Best Deal) मिळवणं देखील एवढं सोपं काम नाही. यासाठी ट्रिक्स माहित असणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचं काम सोपं होईल. पुढे आम्ही अशाच टिप्स आणि ट्रिक्सची माहिती दिली आहे ज्या फॉलो करून तुम्ही हजारोंची बचत करू शकता.

कार्ड डिटेल आणि पत्ता सेव्ह करून ठेवा

ऑनलाइन सेल सुरु होण्याआधी पेमेंट करण्यासाठी ई-कॉमर्स साइटवर तुमचं अकाऊंट असणं आवश्यक आहे. अकाऊंटमध्ये तुमचा पत्ता, क्रेडिट कार्ड (Credit Card) /डेबिट कार्ड (Debit Card) चे डिटेल्स सेव्ह करून ठेवा. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही सेल दरम्यान त्वरित कार्टमध्ये टाकलेलं प्रोडक्ट खरेदी करू शकाल. हे देखील वाचा: भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone; किंमत 7,499 पासून सुरु

रात्री करा लॉगइन

Amazon’s Great Indian Festival Sale 2022 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2022 दोन्ही 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत, ज्यात लाखों ग्राहक खरेदी करतील. परंतु प्राइम मेंबर्स आणि फ्लिपकार्ट प्लस युजर्स एक दिवस आधी म्हणजे 22 सप्टेंबरपासून याचा फायदा घेऊ शकतील. त्यामुळे लॉग इन करण्याची सर्वात चांगली वेळ रात्री असेल कारण तेव्हा ऑनलाइन असणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असते आणि तुम्ही तुमच्या आवडीचं प्रोडक्ट बेस्ट डीलमध्ये विकत घेऊ शकाल.

मेंबरशिपमुळे होईल फायदा

अ‍ॅमेझॉन प्राइम सदस्यांना प्राधान्य देतं आणि दुसरीकडे फ्लिपकार्ट प्लस मेम्बर्सना देखील वेगळे बेनिफिट्स मिळतात. त्यामुळे फ्री शिपिंग, एक्स्ट्रा डिस्काउंट आणि अनेक फायदे मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला ई-कॉमर्स साइटची मेंबरशिप घेण्याचा सल्ला देत आहोत. 12 महिन्यांच्या Flipkart Plus मेंबरशिपसाठी युजर्सना 200 सुपर कॉइन गोळा करावे लागतात. तसेच अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपच्या 30 दिवसांच्या प्लॅनची किंमत 179 रुपये आहे.

कार्टमध्ये ठेवा प्रोडक्ट

ऑनलाइन खरेदी करताना डिस्काउंट मिळवण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे ‘शॉपिंग कार्ट’ मध्ये ते प्रोडक्ट ठेवणे जे विकत घेण्याचं तुम्ही ठरवलं आहे. त्यानंतर पेमेंट न करता साइट सोडता येते. याला ‘शॉपिंग कार्ट अबँडनमेंट’ म्हटलं जातं. अनेक वेबसाइट तुम्हाला नोटिफिकेशन देतात की तुम्ही कार्टमध्ये जे प्रोडक्ट ठेवले आहेत त्यावर तुम्हाला आकर्षक सूट दिली जात आहे. हे देखील वाचा: 6,041 रुपयांच्या हप्त्यावर अ‍ॅमेझॉनवर मिळतेय इलेक्ट्रिक स्कूटी! फक्त 10 स्टेप्समध्ये मिळेल Free Home Delivery

कॅशबॅक अ‍ॅप आणि साइटचा वापर करा

खरेदी करताना जास्तीत जास्त बचत करण्यासाठी तुम्ही गोपॅसा, क्राउनिट, नियरबाय, टॅपजो आणि मॅजिकपिन सारखे कॅशबॅक अ‍ॅप्स डाउनलोड करू शकता. जिथे तुम्हाला डिस्काउंट कुपन सोबतच कॅशबॅक कुपन मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या साइट्सवर खरेदी करताना एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवण्यासाठी करू शकता.

Published by
Siddhesh Jadhav