इथे विका तुमचा जुना मोबाईल फोन आणि मिळवा मजबूत पैसे

मोबाईल टेक्नॉलॉजी सतत बदलत असते आणि फोनचे फीचर्स अ‍ॅडव्हान्स होत असतात. टेक कंपन्या देखील पुढे जाण्याच्या स्पर्धेमुळे नवनवीन टेक्नॉलॉजी असलेले स्मार्टफोन लाँच करत असतात. दर महिन्याला डझनभर नवीन मोबाईल फोन मार्केटमध्ये लाँच होतात ज्यात कोणतं ना कोणतं तरी फीचर व स्पेसिफिकेशनस अ‍ॅडव्हान्स असतं. परिस्थिती अशी आहे की आज घेतलेला स्मार्टफोन काही आठवडयांनी आऊटडेटेड वाटू लागतो. आणि हे फोन्स Used Mobile Phone किंवा Second Hand Smartphone च्या श्रेणीत येतात.

नवीन टेक्नॉलॉजी व अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेले नवीन स्मार्टफोन्स मोबाईल युजर्सना जुन्या स्मार्टफोन्सना सोडून नवीन हँडसेट विकत घेण्यास भाग पाडतात. ट्रेंडमध्ये राहण्यासाठी लोक आपला सेकंड हँड मोबाईल विकून नवीन डिवायस खरेदी करण्याचा विचार करतात. जर तुम्हाला देखील तुमच्या स्मार्टफोनचा कंटाळा आला असेल तर किंवा तुमचा मोबाईल विकून एखादा नवीन फोन विकत घ्यायचा असेल तर पुढे आम्ही 5 अशा वेबसाईट्सची माहिती दिली आहे ज्या तुमच्या Old Used Mobile Phone व Second Hand Smartphone च्या बदल्यात मजबूत पैसे देऊ शकतात.

1. Amazon

जर तुम्हाला तुमचा सेकंड हँड मोबाईल फोन विकून एखादा नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन यात पटाईत आहे. या शॉपिंग साईटवर तुम्हाला Used Smartphone च्या बदल्यात पैसे मिळत नाहीत परंतु Exchange Offer च्या स्वरूपात ही वेबसाईट नवीन फोनच्या खरेदीवर मोठा डिस्काउंट देते. जर कोणता नवीन स्मार्टफोन घ्यायचा ठरलं असेल तर अ‍ॅमेझॉन इंडियावर तुमच्या जुन्या फोनला बेस्ट व्हॅल्यू मिळू शकते.

2. Flipkart / 2Gud

अ‍ॅमेझॉनप्रमाणे फ्लिपकार्ट देखील नवीन स्मार्टफोनच्या सेलवर एक्सचेंज ऑफर सादर करतं. इथे देखील नवीन फोन विकत घेताना तुम्ही तुमचा जुना मोबाईल Exchange केल्यास भरघोस सूट मिळू शकते. टूगुड नावाच्या वेबसाईट सोबत देखील फ्लिपकार्टची भागेदारी आहे जी जुने फोन घेते आणि विकण्याचे देखील काम करते. इथे देखील Refurbished Phones चा चांगला मोबदला मिळू शकतो.

3. Cashify

गेल्या काही वर्षांमध्ये Second Hand SmartPhones च्या खरेदी-विक्रीमध्ये कॅशिफायनं आपलं नाव मोठं केलं आहे. ही वेबसाईट जुने व वापरलेले स्मार्टफोन्स विकत देखील घेते आणि विकते देखील. कॅशिफायची चांगली बाब म्हणजे या वेबसाईटवर काही स्टेप्समध्ये तुमच्या मोबाईलची व्हॅल्यू किती आहे हे सांगितले जाते. त्यामुळे युजरला फोन विकायचा की नाही हा निर्णय घेणं सोपं होऊन जातं.

4. OLX

ओएलएक्स जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा जुना अड्डा आहे. जर मोबाईल फोन्सबाबत बोलायचे झाले तर या प्लॅटफॉर्मवर खरेदी करणारी आणि विकणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्क साधू शकते. ज्याला आपला सेकंड हँड फोन विकायचा आहे तो सर्व डिटेल्स OLX वर सबमिट करतो तसेच ज्याला फोन विकत घेण्यात रस आहे ती व्यक्ती थेट विक्रेत्यांशी संपर्क साधून भाव करू शकते. त्यामुळे इथे इतर वेबसाईट्सच्या तुलनेत जास्त पैसे मिळण्याची शक्यता असते.

5. Cash for Phone

कॅश फॉर फोन हा या क्षेत्रातील नवीन प्लॅटफॉर्म आहे परंतु आपल्या सोप्या प्रोसेसमुळे इतर अनेक प्रतिस्पर्ध्यांना याने मागे टाकले आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डायरेक्ट तुमच्या फोन ब्रँड आणि मॉडेलची माहिती देऊन त्याबदल्यात मिळणाऱ्या जास्तीत जास्त रकमेची माहिती मिळवू शकता. ही सेल व्हॅल्यू जाणून घेण्यासाठी तुम्हाला लॉगइन किंवा मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा लागत नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here