Huawei ने आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Enjoy 10e स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हुवावे एन्जॉय 10ई कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. तसेच फोन कंपनीने तीन कलर ऑप्शन म्हणजे एमरल्ड ग्रीन, मिडनाइट ब्लॅक आणि पर्ल व्हाइट मध्ये सादर केला आहे. पण फोन भारतात लॉन्च करण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Huawei Enjoy 10e ची किंमत
कंपनीने Enjoy 10e तीन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. हा डिवाइस 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मध्ये सादर केला गेला आहे. 4 जीबी + 64 जीबी वेरिएंटची किंमत CNY 999 (जवळपास 10,300 रुपये) आहे. 4 जीबी + 128 जीबी वेरिएंट 1,199 CNY (जवळपास 12,300 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. पण कंपनीने हुवावे एन्जॉय 10ई च्या सर्वात छोट्या वेरिएंट 3 जीबी रॅम वेरिएंटची किंमत सांगितली नाही. Huawei Enjoy 10e अधिकृतपणे 5 मार्च पासून विक्रीसाठी सादर केला जाईल. कंपनीने वीबो पोस्ट वर याची माहिती दिली आहे.
Huawei Enjoy 10e चे स्पेसिफिकेशन्स
या फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.3 इंचाचा एचडी+ (720 x 1600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच या फोन मध्ये हीलियो पी35 प्रोसेसर दिला गेला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8 गीगाहर्ट्ज आहे. डिवाइस एंडरॉयड 10 अधारित EMUI 10 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. याचा अपर्चर एफ/ 1.8 आहे. सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. फोन मध्ये प्राइमरी सेंसर मध्ये 4x डिजिटल जूम आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे.
कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून हुवावे एन्जॉय 10ई मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, माइक्रो यूएसबी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे. तसेच पावर बॅकअपसाठी डिवाइस मध्ये 5000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.














