हुआवई बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी भारतीय बाजारात आपला लेटेस्ट स्मार्टफोन नोवा 3 सादर करणार आहे. या बातमीला दुजोरा देत शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया ने वेबसाइट वर हुआवई च्या नवीन स्मार्टफोन चे वेबपेज बनवले आहे. अमेजॉन इंडिया वर हुआवई नोवा सीरीज च्या स्मार्टफोन चा वेबपेज बनवण्यात आला आहे आणि सांगण्यात आले आहे की कंपनी 26 जुलै ला हा फोन जगासमोर आणेल.
हुआवई नोवा सीरीज च्या या आगामी स्मार्टफोन च्या वेबपेज वर हॅशटॅग ‘कमिंग 4 यू’ लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे हुआवई नोवा 3 स्मार्टफोन मध्ये 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत, 2 रियर आणि 2 फ्रंट पॅनल वर आहेत. तसेच या वेबपेज वरून नॉच डिसप्ले आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज ची माहिती मिळाली आहे.
अमेजॉन च्या या लिस्टिंग वरून एकीकडे स्पष्ट झाले आहे की हुआवई येत्या 26 जुलै ला आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल, तर दुसरीकडे असे पण समजले आहे की हा फोन अमेजॉन एक्सक्लूसिव असेल. चर्चा अशी पण आहे की याच दिवशी हुआवई नोवा 3 स्मार्टफोन सोबत हुआवई नोवा 3आई नावाने पण एक स्मार्टफोन वेरिएंट भारतीय बाजारात घेऊन येईल.
विशेष म्हणजे पहिल्यांदाच हुआवई कंपनी भारतात नोवा सीरीज चा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हुआवई नोवा 3 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 4 कॅमेरा सेंसर आहेत. फोन च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 24-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी यात 24-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फेस अनलॉक टेक्निक ला सपोर्ट करतो.
हुआवई नोवा 3 पाहता यात 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 वर सादर करण्यात आला आहे सोबत हा किरीन 970 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये माली-जी72 जीपीयू आहे. नोवा 3 आणि नोवा 3आई जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी ला सपोर्ट करतात.
चीन मध्ये हा फोन 6जीबी रॅम सह 64जीबी व 128जीबी च्या दोन स्टोरेज आॅप्शन मध्ये लॉन्च झाला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण भारतात हा फोन याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल का आणि याची किंमत काय असेल यासाठी 26 जुलै ची वाट बघावी लागेल.