Jio नं पुन्हा आणली धमाकेदार ऑफर, 75GB डेटासह 6 शानदार बेनिफिट्स अगदी मोफत

JIO 6TH ANNIVERSARY OFFER: टेलीकॉम कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) नं 5 सप्टेंबर 2022 ला आपल्या लाँचची 6th अ‍ॅनिव्हर्सरी (Jio Anniversary 2022) सेलिब्रेशनच्या निमित्ताने ग्राहकांसाठी शानदार ऑफर सादर केली आहे. कंपनीनं आपल्या ऑफर (Jio Offer) अंतगर्त 2,999 रुपयांच्या प्रीपेड रीचार्जवर अतिरिक्त 75GB डेटा फ्री आणि 6 मोठ्या बेनिफिट्सची घोषणा केली आहे. कंपनीच्या साइटवर आता 2999 रुपयांच्या प्लॅनसह मिळणारे हे सर्व मिळणार लाभ देखील दिसत आहे. चला जाणून घेऊया या ऑफर बाबत सर्वकाही.

Jio ऑफरमध्ये काय मिळेल?

Reliance Jio ची नवीन Anniversary Offer एका वार्षिक प्रीपेड प्लॅनसाठी उपलब्ध आहे. टेलीकॉम कंपनी 2,999 रुपयांच्या लॉन्ग-टर्म पॅकसह मोफत 75GB डेटासह एकूण 6 बेनिफिट्स देत आहे. ही ऑफर जियोच्या अधिकृत अ‍ॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह झाली आहे. जर तुम्ही दीर्घकालीन प्रीपेड प्लॅन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. अशीच ऑफर कंपनीनं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देखील लाँच केली होती, त्यामुळे तेव्हा जर तुम्हाला या बेनिफिट्सचा फायदा घेता आला नसेल तर तुम्ही आता या संधीचा लाभ घेऊ शकता. हे देखील वाचा: स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक

JIO च्या 2,999 रुपयांचा प्लॅनमध्ये काय मिळेल

रिलायन्स जियोच्या 2,999 रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनीकडून रोज 2.5GB डेटा दिला जात आहे. परंतु या ऑफर अंतगर्त ग्राहकांना डेली डेटासह एकूण 75GB अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. अशाप्रकारे युजर्सना या पॅकसह एकूण 912.5GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये रोज 100 SMS सह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल करता येतील. रिलायन्स जियो एक वर्षाचे Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन देखील मोफत देत आहे, ज्याची किंमत 499 रुपये आहे. हा प्लॅन एकदा खरेदी केल्यास 365 दिवस वापरता येईल.

Jio Offer मध्ये मिळणारे अन्य 6 बेनिफिट्स

रिलायन्स जियोच्या अ‍ॅनिव्हर्सरी ऑफर अंतगर्त जियोच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी बेनिफिट्स तर मिळत आहेतच परंतु सोबत अन्य बेनिफिट्स देखील कंपनीनं जोडले आहेत. या प्लॅनमध्ये फ्री डेटा व्यतिरिक्त Ixigo, Netmeds, Ajio, Reliance Digital आणि Jio Savan साठी एक्स्ट्रा कुपन ऑफर केले जात आहे. फक्त एका रिचार्ज सोबत हे सहा बेनिफिट्स मोफत दिले जात आहेत. हे देखील वाचा: या रिचार्ज प्लॅनला तोड नाही! Jio चा 31 दिवसांचा Calendar Month Plan; फ्री कॉलिंग आणि डेटासह अनेक फायदे

विशेष म्हणजे अलीकडेच कंपनीनं Reliance Jio Independence Day Offer सादर केला होता, ज्यात 2999 रुपयांचा प्लॅनमध्ये अगदी अशीच ऑफर दिली जात होती. त्यामुळे आता असे वाटत आहे की कंपनीनं त्या ऑफरचं नाव बदलून यात मिळणारे बेनिफिट्स मात्र तसेच ठेवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here