Airtel चा सर्वात स्वस्त Recharge; डेटा आणि टॉकटाइमसह 28 दिवसांची वैधता

Airtel chpeast 28 days vailidity recharge plan rs 99 data calling minutes

Airtel Recharge Plan: Bharti Airtel देशातील दुसरी सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटर कंपनी आहे. जर तुम्ही देकील एयरटेलचे ग्राहक असाल आणि कंपनीच्या सर्वात स्वस्त (Airtel Cheapest Plan) 28 दिवसांची वैधता असलेला प्लॅन शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत. कंपनीचे प्लॅन 19 रुपयांपासून सुरु होत आहेत. परंतु 28 दिवस पर्यंतच्या वैधतासाठी तुम्हाला कमीत कमी 99 रुपयांची किंमतीचा रिचार्ज करावा लागेल. जर तुम्ही एखादा एवढा स्वस्त प्लॅन शोधत असाल जो तुम्हाला महिन्याभराच्या वैधतेसह इंटरनेट आणि कॉम्प्लिमेंट्री बेनिफिट देखील देतो तर 99 रुपयांच्या बेस्ट रिचार्ज प्लॅन (Airtel Best Plan) म्हणता येईल. पुढे आम्ही तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

Airtel चा 99 रुपयांचा Plan

Airtel चा हा एक स्मार्ट रिचार्ज प्लॅन आहे जो फक्त 99 रुपयांमध्ये येतो. या प्लॅनमध्ये मिळणार फायदे देखील शानदार आहेत. परंतु, या प्लॅनमध्ये फ्री SMS आणि एयरटेल थँक्स बेनिफिट्स मिळत नाहीत, तरी देखील युजर्सना व्हॉइस कॉलिंग आणि डेटा सोबतच एक महिन्यांपर्यंतची वैधता मिळते. पुढे आम्ही तुम्हाला प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती दिली आहे. हे देखील वाचा: Airtel 5G Launch: Airtel 5G साठी विकत घ्यावं लागणार का नवीन SIM Card? कंपनीनं दिलं उत्तर

Airtel chpeast 28 days vailidity recharge plan rs 99 data calling minutes

28 दिवस वैधतेसह मिळेल टॉकटाइम

99 रुपयांचा प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा आणि व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. या प्लॅनमध्ये युजरला 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 200MB डेटा दिला जातो. तसेच कंपनीच्या साइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार एक पैसे प्रति सेकंड या दराने टॅरिफ कॉलिंग आणि लोकल SMS साठी 1 रुपये आणि STD SMS साठी 1.5 रुपये चार्ज केले जातील. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते.

एयरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन

विशेष म्हणजे हा कंपनीचा सर्वात किफायतशीर प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे, ज्यात ग्राहकांना SMS, डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत कंपनीकडे अजून देखील अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत. परंतु ते व्हाउचर्स असल्यामुळे तेव्हाच वापरता येतात जेव्हा तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह बेस प्रीपेड प्लॅन असतो. एयरटेलचा हा रिचार्ज प्लॅन त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांना सिम सक्रिय ठेवायचं आहे आणि त्यासाठी जास्त खर्च देखील करायचा नाही. हे देखील वाचा: Airtel चं इंटरनेट स्लो झालं आहे का? रॉकेट स्पीडनं 4G इंटरनेट वापरण्यासाठी वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

Airtel chpeast 28 days vailidity recharge plan rs 99 data calling minutes

Airtel 5G साठी घ्यावं लागेल का नवीन SIM Card?

एयरटेल 5जी सर्व्हिस लाँच टाइमलाइनची माहिती देत Gopal Vittal यांनी सांगितलं की तुमच्या एयरटेल सिममध्ये आधीपासून 5G क्षमता आहे. त्यामुळे तुम्हाला 5जी स्मार्टफोनवर सहज Airtel चं जुनं सिम वापरता येईल. 5जी सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनच्या नेटवर्क सेंटिंगमध्ये जाऊन 4जी किंवा LTE व्यतिरिक्त 5जी ची निवड करा आणि 5जी सर्व्हिसचा आनंद घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here