5,000एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पंच-होल डिस्प्ले असलेला Huawei P Smart 2021

Huawei ने आज अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन Huawei P Smart 2021 सादर केला आहे. जसे कि नावावरून समजले असेल कि हा फोन हुआवई पी स्मार्टचा अपग्रेडेड वर्जन आहे जो बजेट प्राइस मध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. हुआवई पी स्मार्ट 2021 सध्या कंपनीने आस्ट्रिया मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये येईल. पुढे जाणून घेऊया हुआवईच्या या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बाबत.

Huawei P Smart 2021

हुआवई पी स्मार्ट 2021 कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या आईपीएस एलसीडी फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के आहे ज्यात डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे.

Huawei P Smart 2021 कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो ईएमयूआई 10.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये हुआवईचा किरीन 710ए चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हुआवईचा हा फोन प्री-इंस्टाल्ड गूगल ऍप्स सह येत नाही आणि हुआवई ऍप गॅलरी सोबतच हुआवई मोबाईल सर्विसला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हुआवईचा हा नवीन फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Huawei P Smart 2021 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक, एनएफसी व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वेरिएंट व किंमत

Huawei P Smart 2021 आस्ट्रिया मध्ये हा एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हुआवई पी स्मार्ट 2021 Black, Gold आणि Green कलर मध्ये EUR 229 च्या किंमतीवर लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 19,500 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here