आईबॉल ने लॉन्च केला अनोखा टॅबलेट, हातात घेताच सांगेल तुमच्या आधार कार्ड ची माहिती

आईबॉल ने भारतीय बाजारात आपली टॅबलेट सीरीज पुढे नेत अजून एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. कपंनी ने स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट बाजार आणला आहे. या टॅबलेट ची अनोखी बाब म्हणजे यातील आधार सर्टि​फाइड फिंगरप्रिंट स्कॅनर. हा स्कॅनर कोणत्याही यूजर चे फिंगरप्रिंट स्कॅन करून त्याच्या आधार कार्ड शी संबंधी माहिती देण्याची क्षमता यात आहे.

आईबॉल स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट एक स्टँर्डडाइजेशन टेस्टिंग अ‍ॅण्ड क्वॉलिटी सर्टिफिकेशन (STQC) सर्टि​फाइड डिवाईस आहे जो आधार डाटा रिड करण्यासह त्याचे वेरिफिकेशन पण करतो. या टॅबलेट चा वापर बँक, सरकारी ऑफिस, महाविद्यालय, सेल्स ऑटोमेशन सारख्या त्या जागी करता येईल, जिथे आधार ऑथेंटिकेशन ची गरज पडते.

टॅबलेट चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 1024 X 600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 7-इंचाच्या मोठया डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा टॅबलेट एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे तसेच 64बिट 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर कोर्टेक्स ए53 चिपसेट प्रोसेसर वर चालतो. कंपनी ने या डिवाईस मध्ये 2जीबी रॅम मेमरी दिली आहे. हा टॅबलेट 8जीबी आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिंएट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 32जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट मध्ये बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. चांगल्या फोटो साठी कंपनी ने दोन्ही पॅनल्स वर एलईडी फ्लॅश दिला आहे. आईबॉल ने आपला नवीन डिवाईस डुअल सिम तसेच 4जी एलटीई सपोर्ट सह लॉन्च केला आहे. तसेच ब्लूटू​थ, वाईफाई व ओटीजी सपोर्ट सह यात पावर बॅकअप साठी 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आईबॉल स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट 22 भारतीय भाषा समजण्यास सक्षम आहे. हा ​स्मार्ट डिवाईस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च झाला आहे जो 18,999 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सह आॅफलाईन बाजारातून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here