एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटर धावणारी iGowise BeiGo X4 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

Highlights

  • iGowise BeiGo X4 ची किंमत Rs. 1.1 lakh (ex-showroom) आहे.
  • या थ्री-व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60 लीटर बूट स्पेस आहे.
  • BeiGo X4 मध्ये फायर-रेसिस्टेंट LiFePO4 बॅटरी पॅक मिळतो.

iGowise Mobility नं भारतीय ईव्ही बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर BeiGo X4 लाँच केली आहे. बंगळुरूमधील इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीच्या या ई-स्कूटरची खासियत म्हणजे यात दोन नव्हे तर तीन चाकं मिळतात. ही एक थ्री व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात 150km च्या रेंज सोबतच रायडरला 60-लीटरची मोठी स्पेस मिळेल. तसेच ही चालवणाऱ्या रायडरला पडण्याची भीती नाही. पुढे आम्ही या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि इतर माहिती दिली आहे.

iGowise BeiGo X4 ची प्राइस

iGowise BeiGo X4 बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं ही भारतात 1.1 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये लाँच केली आहे. तसेच, कंपनीनं ही इलेक्ट्रिक स्कूटर आपल्या वेबसाइटवर लिस्ट केली आहे. परंतु अद्याप हिची बुकिंग सुरु झाली नाही. कंपनी या ई-स्कूटरवर पाच वर्ष किंवा एक लाख किलोमीटरची वॉरंटी देखील देत आहे. हे देखील वाचा: भारतीय कंपनीनं घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा दमदार गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु

iGowise BeiGo X4 Photos

BeiGo X4 ची डिजाइन

लुक व डिजाइन पाहता, प्रथमदर्शनी iGowise BeiGo X4 खूप आकर्षक वाटते. यात सर्कुलर हेडलॅम्प यूनिटसाठी एप्रन-माउंटेड हाउसिंग, मोठा हँडलबार, अँगुलर मिरर आणि स्प्लिट-टाइप सीटसह एक फ्लश-टाइप ट्यूबलर ग्रॅब रेल आणि एक स्लीक LED टेललॅम्प आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक हँडलबार-माउंटेड फुली-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. तसेच हीचा लुक आणखी खुलवण्यासाठी कंपनीनं या ई-स्कूटर मध्ये ट्राइक फ्रंट अलॉय व्हील आणि रियर स्टील व्हील्स दिले आहेत.

iGowise BeiGo X4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iGowise BeiGo X4 मध्ये कंपनीनं रियर-व्हील-माउंटेड हब-टाइप इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी फायर प्रूफ लिथियम-आयन फॉस्फेट (LiFePO4) बॅटरी पॅकसह येते. तसेच, कंपनीनुसार ही एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटर पर्यंत चालवता येते. हे देखील वाचा: शाहरुख खानचा ‘पठाण’ पाहताना दिसली POCO X5 Pro लाँच डेट; पुढील आठवड्यात येणार दणकट फोन

तसेच या ई-स्कूटरची चार्जिंग सोपी करण्यासाठी यात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे, जिच्या मदतीने फक्त काही तासांत ही फुल चार्ज करता येईल. यात रायडरच्या सुरक्षेसाठी कंबाइन ब्रेकिंग सिस्टम (CBS) सह फ्रंट व्हीलवर डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here