भारतीय कंपनी घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु

Highlights

  • Indus Battle Royale गेम भारतीय कंपनी SuperGaming नं डेव्हलप केला आहे.
  • Indus Battle Royale गेम PUBG Mobile आणि BGMI सारखा असेल.
  • इंडियन बॅटल रोयाल गेमसाठी Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे.

इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming नं घोषणा केली आहे की ते लवकरच स्वदेशी बॅटल रोयाल (Battle Royale) व्हिडीओ गेम Indus Battle Royale सादर करणार आहेत. या गेमचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. Indus Battle Royale च्या गेमप्लेचा ट्रेलर पाहून युजर्सना ‘इंडो फ्यूचरिस्टिक’ बॅटल रोयालचा एक्सपीरियंस मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स देखील आहेत. ट्रेलरच्या शेवटी कंपनीनं सांगितलं आहे की या गेमवर सध्या काम सुरु आहे.

Indus गेम प्री रजिस्ट्रेशन उपलब्ध

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी गेमचं प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. कंपनीच्या मते, iPhone साठी लवकरच प्री-रजिस्ट्रेशन सुरु होईल. इथे आम्ही तुम्हाला इंडस गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: महिनाभराची वैधता आणि 60GB डेटा; Airtel ने लाँच केले दोन नवीन Monthly Plan

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करा आणि Indus Battle Royale सर्च करा.

स्टेप 2: तुम्हाला सुपरगेमिंग एलजीचा Indus Battle Royale गेम मिळेल. यावर क्लिक करा आणि प्री-रजिस्ट्रेशन ऑप्शनवर टॅप करा.

स्टेप 3: गेम लाँच झाल्यावर ऑटोमेटिक इंस्टॉल बटनवर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचं प्री-रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

What is Indus Battle Royale?

बॅटल रोयाल गेम Indus चा ट्रेलर पाहून समजलं आहे की हा गेम मोठ्या प्रमाणावर PUBG Mobile, Free Fire, Fortnite आणि BGMI सारखा आहे. यात प्लेयर्स मॅच जिंकण्यासाठी एयरोप्लेननं ‘MAP’ वर उतरतात आणि फायनल प्राइजसाठी युद्ध करतात. इंडस गेमच्या डेव्हलपर्सनुसार “मिथवॉकर (Mythwalker) म्हणून या इंडो-फ्यूचरिस्टिक बॅटलग्राउंड वीरलोक तसेच पॅरागन्स आणि आमच्या कॅरेक्टर्सच्या स्किनची ही पहिली झलक आहे.” या ट्रेलरमध्ये कंपनीनं आपल्या गेममधील व्हेपन, गियर, कंज्यूमेबल्सची झलक दाखवली आहे.

Indus गेमचा ट्रेलर इंडियन क्लासिक आणि हिप-हॉप मिक्स म्यूजिकनं सुरु होतो. तसेच गेमचे कॅरेटर आदम, आद्या, सिर-ताज, बिग-गजची एंट्री होते. गेमचे ग्राफिक्स पाहता खूप कलरफुलर दिसत आहेत जे इंडियन टचसह येतात. तसेच यात फ्यूचरिस्टिक एलिमेंट्स मिळतात. हे देखील वाचा: OPPO Reno 8T च्या लाँचची तारीख ठरली; शानदार कॅमेरा असल्याचा कंपनीचा दावा

हा गेम पुण्यातील इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming ने डेव्हलप केला आहे. गेममध्ये प्लेयर्स Mythwalker च्या रूपात खेळतील जो इंटरगॅलेक्टिक सिंडिकेट COVEN साठी काम करत आहे. तुम्हाला एक दुर्लभ प्राकृतिक खनिज Cosmium गोळा करायचं आहे जो वेळावेळी जागा बदलू शकतो. या ट्रेलरमधून गेमच्या कॅरेक्टर, कॉस्मियम, लूट सिस्टम, गेमप्ले (Indus Battle Royale GamePlay) आणि मॅपची झलक दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here