भारतीय लोक जास्त वेळ टीवी बघण्याच्याऐवजी आॅनलाईन वीडियो बघण्यात घालवतात : सर्वे

हि गोष्ट कोणीच नाकारू शकणार नाही कि गेल्या काही वर्षांत सामान्य माणूस इंटरनेटचा वापर आधीपेक्षा जास्त करू लागला आहे. कमी किंमतीती मिळणार डेटा आणि स्वस्त होत असलेल्या स्मार्टफोन्स मुळे देशातील लोकांचा मोबाईल वापर वाढला आहे. आपल्याला लागलेले हे स्मार्टफोनचे हे व्यसन फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी एक सर्वे रिपोर्ट आला आहे ज्यात खुलासा झाला आहे कि भारतीय लोक घरात टीवी बघण्यापेक्षा असत वेळ स्मार्टफोन वर वी​डियो बघण्यात घालवतात आणि हे आकडे जगातील इतर देशांपेक्षा खूप पुढे आहेत.

ग्लोबल डिजीटल कंटेंट डिलीवर प्लॅटफॉर्म लाईमलाइट नेटवर्क ने नुकताच आपला एक सर्वेचा रिपोर्ट शेयर केला हे ज्यातून हे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. या रिर्पोट वरून समजले आहे कि भारतीय लोक टीवी बघण्यापेक्षा जास्त वेळ स्मार्टफोन वर आॅनलाईन वीडियो बघण्यात घालवत आहेत. रिपोर्ट नुसार एक भारतीय एका आठवड्यात सरासरी 8 तास 28 मिनिटे एवढा वेळ स्मार्टफोन वर ​वीडियो बघण्यात घालवत आहे. तर संपूर्ण आठवड्यात तो फक्त 8 तास 8 मिनिटे टीवी बघतो.

धक्कादायक बाब हि आहे कि भारतीयांचा हा आॅनलाईन वीडियो बघण्यात जाणारा हा वेळ संपूर्ण जगाच्या सरासरी पेक्षा खूप जास्त आहे. संपूर्ण जगातील लोक सरासरी 6 तास 45 मिनिटेच आॅनलाईन वी​डियो बघतात. फक्त दोन वर्षात हा वेळ दुप्पटीपेक्षा जास्त झाला आहे. साल 2016 च्या तुलनेत साल 2018 मध्ये आॅनलाईन वीडियो बघण्यात 58 टक्क्यांची वाढ झाली आहे.

रिपोर्ट नुसार आॅनलाईन वीडियो कंटेंट बघण्यात फिलिपिंस सर्वात पुढे आहे. तिथले लोक एका आठवड्यात सरासरी 8 तास व 46 मिनिटे वीडियो बघतात. या लिस्ट मध्ये दुसरे नाव अमेरिकेचे आहे, तिथे एका आठवड्यात सरासरी 8 तास 30 मिनिटे आॅनलाईन वीडियो बघितले जातात, जे भारतीयांच्या जवळच आहेत. तर जर्मनीचे लोक सर्वात कमी वेळ आॅनलाईन वीडियो बघण्यात घालवतात. रिपोर्ट नुसार जर्मनीचे लोक एका आठवड्यात 5 तास 2 मिनिटे वीडियो बघतात.

या सर्वे मध्ये 10 देशांतील 5,000 पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. या देशांमध्ये भारता सह अमेरिका, ब्रिटेन, फ्रांस, जर्मनी, इटली, जापान, फिलिपिंस, सिंगापुर आणि साउथ कोरिया सामील झाले होते. सर्वे मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि भारतात आॅनलाईन वीडियो बघताना ​बफरिंगची समस्या लोकांना जास्त त्रास देते. देशातील 46 टक्के स्मार्टफोन यूजर्सना खराब आणि अडकत चालणाऱ्या नेटवर्क वर वीडियो बघावे लागतात जे खूपच त्रासदायक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here