25,000 रुपयांपेक्षा कमी मध्ये लाँच होईल Infinix GT 20 Pro, 21 मे ला होईल एंट्री

इंफिनिक्स येत्या 21 मे ला भारतात आपला दमदार गेमिंग स्मार्टफोन Infinix GT 20 Pro लाँच करणार आहे. या संदर्भात सतत सोशल मीडिया आणि वेबसाईटवर माहिती समोर आली आहे. तसेच, आता नवीन पोस्टमध्ये ब्रँडच्या हँडलवरून मोबाईलची किंमत रेंज सांगितली आहे. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Infinix GT 20 Pro 5G ची किंमत रेंज

 • 21 मे च्या लाँच कार्यक्रमाआधी कंपनीने घोषणा केली आहे की Infinix GT 20 Pro 25,000 रुपयांपेक्षा कमीमध्ये येईल.
 • हा स्मार्टफोन भारतात ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर सेल होईल. फोनची मायक्रो-साईट पण लाईव्ह झाली आहे.
 • तसेच अगामी जीटी 20 प्रो एक गेमिंग-फोकस स्मार्टफोन आहे, ज्यात सायबर मॅक डिझाईन मिळेल. ब्रँडने याला सर्वात पावरफुल गेमिंग स्मार्टफोनच्या रूपामध्ये टिझ केले आहे.
 • भारतात Infinix GT 20 Pro 5G ला मेचा ऑरेंज, मेचा सिल्व्हर आणि मेचा ब्लू सारख्या तीन कलरमध्ये सादर केले जाईल.

Infinix GT 20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

 • डिस्प्ले: Infinix GT 20 Pro 5G मोबाईलमध्ये युजर्सना 6.78-इंचाचा FHD+अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. यावर 144Hz रिफ्रेश रेट, 1,300 निट्स पीक ब्राईटनेस, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि Pixelworks X5 टर्बो गेमिंग डिस्प्ले चिपसेट दिली जाईल.
 • प्रोसेसर: फोनमध्ये परफॉरमेंससाठी कंपनी MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर देईल. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली-G610 MC6 जीपीयू लावला जाईल.
 • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत मोबाईलमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा असेल. तसेच व्हर्च्युअल रॅमचा पर्याय पण मिळेल.
 • कॅमेरा: Infinix GT 20 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच होईल. ज्यात 108MP OIS असलेला Samsung HM6 सेन्सर, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.
 • बॅटरी: Infinix GT 20 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल. याला चार्ज करण्यासाठी 45W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.
 • इतर: फोनमध्ये पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP54 रेटिंग आणि सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर पण असेल.
 • ओएस: Infinix GT 20 Pro 5G भारतात अँड्रॉईड 14 आधारित HiOS 14 वर काम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here