New OTT Releases This Week: धमाकेदार असेल वीकेंड, हे चित्रपट व सीरीज बघण्याचा बनवा प्लॅन

New OTT releases this week: तुमच्या आवडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील नवीन चित्रात आणि सीरीज (New Releases OTT) रिलीजसाठी तयार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar, Netflix, आणि Amazon Prime Video वर अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमांस किंवा कॉमेडी असलेला नवीन कंटेंट बघण्याचा प्लॅन करत असलेल्या दर्शकांसाठी आम्ही या आर्टिकलमध्ये या आठवड्यात रिलीज (New OTT releases this week) झालेल्या चित्रपट व सीरीजची माहिती देणार आहोत. यावेळी तुमची एंटरटेनमेंट करण्यासाठी Do Baaraa, Aashiqana Season 2, Good Bad Girl, Mismatched Season 2, आणि She-Hulk season finale रिलीज होणार आहेत.

Top 5 OTT releases this week

  • Do Baaraa
  • Aashiqana Season 2
  • She-Hulk: Attorney at Law Season Finale
  • Mismatched Season 2
  • Good Bad Girl

Do Baaraa

दो बारा उर्फ 2:12 एक मिस्ट्री ड्रामा आहे ज्यात थप्पड (2020) नंतर तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे आणि मिराज नावाच्या टाइम ट्रॅव्हल 2018 स्पॅनिश चित्रपटावर आधारित आहे. हा सायन्स फिक्शन चित्रपट Netflix वर 15 ऑक्टोबर पासून बघता येईल. हे देखील वाचा: पेडल न मारताच ही सायकल चालेल 115km; Decathlon ची दमदार इलेक्ट्रिक सायकल लाँच

Aashiqana Season 2

आशिकाना सीजन 2 एक रोमांचक अ‍ॅक्शन ड्रामा सीरीज आहे, जी एक साहसी मुलगी चिक्की (ख़ुशी दुबे) आणि एक उत्साही इंस्पेक्टर यश (जायन इबाद खान) यांच्या अवतीभवती फिरते. सीरीजमध्ये दोघांनाही भूतकाळातील एक दुर्दैवी आणि अप्रिय घटना त्रास देत आहे. ही सीरीज डिज्नी प्लस हॉटस्टारवर 10 ऑक्टोबरला रिलीज झाली आहे.

She-Hulk: Attorney at Law Season Finale

She-Hulk: Attorney at Law season चा शेवटचा एपिसोड अखेरीस रिलीज झाला आहे. ही सीरीज Disney Plus Hotstar वर बघता येईल. Marvel Studios series finale जवळपास 35 मिनिटांचा आहे. या सीरीजमध्ये Tatiana Maslany नं शक्तिशाली She Hulk (Jennifer Walters) ची भूमिका साकारली आहे, जी सुपर हिरो पावर असलेल्या लोकांचे खटले वकील म्हणून लढत आहे. 9-episode च्या या Marvel series मध्ये She Hulk कडे Hulk प्रमाणेच superpowers आहेत.

Mismatched Season 2

रॉमकॉममध्ये दोन किशोरवयीन डिंपल आणि ऋषी यांची मैत्री दाखवण्यात आली आहे. या सीरीजमध्ये प्रेम, मत्सर, शत्रुत्व आणि तणाव असं खूप काही अशे. ही सीरीज Netflix वर बघता येईल. वेब सीरीजमध्ये प्राजक्ता कोळी, रोहित सराफ आणि रणविजय सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मागच्या सीजनमध्ये प्राजक्ता आणि रोहितची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती. तर या सीजनमध्ये डिंपल आणि ऋषीच्या नात्याला नवं वळण, भोवतालच्या लोकांचा दबाव, प्रेम सारख्या गोष्टींशी तरुणाईचा लढा दाखवण्यात आला आहे. हे देखील वाचा: सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत

Good Bad Girl

Good Bad Girl एक कॉमेडी-ड्रामा सीरीज आहे जी Maya Ahuja उर्फ Bulbul च्या आयुष्याच्या अवतीभवती फिरते. हे पात्र Samridhi Dewan नं साकारलं आहे. या सीरीजमध्ये Maya एक lawyer आहेत जी आपली नोकरी वाचवण्यासाठी खोटं बोलते आणि त्यानंतर निर्माण होणारी स्थिती खूप मजेदार आहे. ही सीरीज सोनी लिववर बघता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here