165KM च्या जबरदस्त रेंजसह आली Hero ची पहिली Electric Scooter, किंमत आहे इतकी…

Hero Vida V1 electric scooter launched in India price Rs 1.45 lakh sale range photos

Hero Vida V1 electric scooter: Hero Motocorp (हीरो मोटोकॉर्प) ची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटी अखेरीस भारतात लाँच झाली आहे. Hero ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नवीन Vida (वीडा) सब-ब्रँड (Hero Vida Electric Scooter) अंतगर्त सादर करण्यात आली आहे. विडा V1 (Vida V1) ही कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 Pro आणि Vida V1 Plus अशा दोन व्हेरिएंट मध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारात हिची थेट टक्कर Ola S1 Pro, Ather 450X Gen3, Bajaj Chetak आणि TVS iQube शी होईल, अशी चर्चा आहे. पुढे आम्ही तुम्हाला Hero Vida V1 electric scooter Price, Sale, Range आणि Features ची माहिती दिली आहे.

Hero Vida V1 electric scooter Price

कंपनीनं विडा V1 प्लस भारतात 1.45 लाख रुपये (ex-showroom) आणि विडा V1 प्रो को 1.59 लाख रुपये (ex-showroom) मध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीनं माहिती दिली आहे की यांची बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरु होईल. तसेच, V1 प्लस ई-स्कूटर कंपनीनं तीन कलर ऑप्शन- Matte White, Matte Sports Red आणि Gloss Black मध्ये सादर केली आहे. दुसरीकडे प्रो व्हेरिएंट Matte White, Matte Sports Red, Gloss Black सह Matte Abrax Orange कलर ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे.

Hero Vida V1 electric scooter launched in India price Rs 1.45 lakh sale range photos

2499 रुपयांमध्ये करा बुक

इच्छुक ग्राहक 2499 रुपयांच्या टोकन अमाउंटसह या इलेक्ट्रिक स्कूटी बुक करू शकतात. ज्यांची डिलिव्हरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यपासून सुरु होईल. सुरुवातीला या इलेक्ट्रिक स्कूटर दिल्ली, बंगळुरू आणि जयपुरमध्ये विकल्या जातील. हे देखील वाचा: 165KM च्या जबरदस्त रेंजसह आली Hero ची पहिली Electric Scooter, किंमत आहे इतकी…

Hero Vida V1 electric scooter launched in India price Rs 1.45 lakh sale range photos

Hero Vida V1 Pro चा टॉप स्पीड आणि रेंज

कंपनीनं माहिती दिली आहे की विडा V1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 80 किलोमीटर इतका आहे. कंपनीचा दावा आहे की स्कूटरची बॅटरी 1.2 किलोमीटर प्रति मिनिट दराने चार्ज होते. तसेच IDC नुसार ही ई-स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 165 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. तसेच ही 3.2 सेकंदात ताशी 0-40 किलोमीटरचा वेग गाठू शकते.

Hero Vida V1 Plus चा टॉप स्पीड आणि रेंज

हीरो विडा V1 प्लस बद्दल बोलायचं तर ही स्कूटर देखील ताशी 80 किलोमीटरचा वेग देते. त्याचबरोबर या ई-स्कूटरची बॅटरी 1.2 किलोमीटर प्रति मिनिट दराने चार्ज होते. IDC चा दावा आहे की ही बॅटरी असलेली स्कूटी फुल चार्जमध्ये 143 किलोमीटरची रेंज देते. रायडर 3.2 सेकंदात 0 ते ताशी 40 किलोमीटरचा स्पीड गाठू शकतो.

Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर्स के फीचर्स

Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात एक डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह सात इंचाची टचस्क्रीन, क्रूज कंट्रोल, टू-वे थ्रॉटल, कीलेस कंट्रोल आणि SoS अलर्टचा समावेश आहे. हे देखील वाचा: येत आहे ‘या’ कंपनीची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी, जाणून घ्या किती असेल किंमत

सुरक्षित बॅटरी

कंपनीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्णपणे सुरक्षित आहे. बॅटरी 2 लाख किलोमीटर, 25 हजार तास, हाय टेम्प्रेचरवर टेस्ट करण्यात आली आहे, ज्यात ही ई-स्कूटर यशस्वी ठरली आहे. तसेच कंपनीनं सांगितलं की बॅटरी पडल्यावर किंवा धडक बसल्यावर देखील काम करेल. कंपनीनं हिची सतत 72 तासांची टेस्ट ड्राईव्ह देखील केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here