48MP कॅमेऱ्यासह Vivo Y52 5G ची एंट्री; तैवानमध्ये झाला लाँच

विवो कंपनीनं गेल्या महिन्यात Vivo Y32t, Vivo Y52t 5G आणि Vivo Y72t 5G सारखे अनेक शानदार स्मार्टफोन टेक मार्केटमध्ये लाँच केले आहेत. आता विवो वाय सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन Vivo Y52 (2022) देखील लाँच झाला आहे. हा विवो मोबाइल 48MP camera, 4GB RAM, MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 18W 5,000mAh battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. विवो वाय52 (2022) ची प्राइस 20,000 रुपयांच्या आसपास आहे जो सध्या तैवानमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. पुढे या विवो स्मार्टफोनची प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y52 (2022) चे स्पेसीफिएकेशन्स

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी प्लस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच झाला आहे जो आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 96 टक्के एनटीएससीला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.6 टक्के आहे. Vivo Y52 (2022) चे डायमेंशन 163.95 x 75.3 x 8.5 एमएम आणि 193 ग्राम आहे. हे देखील वाचा: Breaking: स्वस्त Jio Laptop ची विक्री झाली सुरु; कोणताही गाजावाजा न करता मार्केट प्लेसवर लिस्ट

Vivo Y52 (2022) launch price and specification details

Vivo Y52 5G (2022) अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 युआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल मार्केटमध्ये 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे आणि यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून एक्सपांड करता येईल.

फोटोग्राफीसाठी विवो वाय52 (2022) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y52 5G (2022) मोबाइल फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: दोन दिवस टिकेल या Samsung फोनची बॅटरी; अत्यंत कमी किंमतीत 50MP कॅमेरा असलेला फाडू फोन

Vivo Y52 (2022) launch price and specification details

Vivo Y52 5G (2022) ड्युअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. 3.5एमएम जॅक व एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगर प्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या विवो मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. सध्या हा स्मार्टफोन तैवानमध्ये लाँच झाला आहे परंतु लवकरच याची एंट्री भारतीय बाजारात देखील होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here