9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6 जीबी रॅम, 5200एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन

Infinix काही दिवसांपूर्वी इंटरनेशनल मार्केट मध्ये आपल्या ‘हॉट सीरीज’ अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10 आणि Infinix Hot 10 Lite सादर केले होते. अंर्तराष्ट्रीय बाजारात यश मिळवल्यानंतर आता या सीरीजने भारतीय बाजारात पण एंट्री घेतली आहे. इनफिनिक्सने भारतात आपल्या या सीरीज अंतर्गत Infinix Hot 10 स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन फक्त 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix Hot 10

इनफिनिक्स हॉट 10 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या मोठ्या एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे तसेच या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.5 टक्के आहे.

Infinix Hot 10 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.0 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड एलईडी फ्लॅश सह एफ/1.85 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबतच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स हॉट 10 मध्ये 5,200एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हि बॅटरी पावर मॅरेथॉन टेक्नोलॉजी सह येते जी बॅटरी लाइफ 25 टक्क्यांनी वाढवते.

किंमत व सेल

Infinix Hot 10 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह फक्त 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल, जिथे इनफिनिक्स हॉट 10 Ocean Wave, Amber Red, Obsidian Black आणि Moonlight Jade च्या चार कलर वेरिएंट्स मध्ये विकत घेता येईल.

वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here