4 जीबी रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह येत आहे Infinix Hot 9 Pro, लॉन्चच्या आधी बघा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स

टेक ब्रँड Infinix ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘हॉट सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Infinix Hot 9 लॉन्च केला आहे. मागे हि बातमी समोर आली होती कि कंपनी भारतात पण लवकरच आपली हि सीरीज वाढवणार आहे ज्या अंतर्गत Infinix Hot 9 Pro फोन लॉन्च केला जाऊ शकतो. अलीकडेच हा डिवाईस गूगल प्ले कंसोल वर पण समोर आला होता. तर आता लॉन्चच्या आधीच इनफिनिक्स हॉट 9 प्रो चा खरा फोटो आणि फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Infinix Hot 9 Pro च्या लुक व डिजाईन सोबतच फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. लुकच्या बाबतीत हा फोन बऱ्याच अंशी इनफिनिक्स हॉट 9 सारखाच आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनच्या चारही कडा बेजल लेस आहेत तसेच डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

इनफिनिक्स हॉट 9 प्रो चा रियर कॅमेरा सेटअप पॅनलच्या वर उजवीकडे आहे. हा कॅमेरा सेटअप चौकोनी आकार आहे ज्यात डावीकडे चार कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तसेच डावीकडे फ्लॅश लाईट सह लेंसची माहिती लिहिण्यात आली आहे. Infinix Hot 9 Pro च्या साईड पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबतच पावर बटण पण देण्यात आला आहे. आशा आहे कि फोनचा पावर बटण फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड असेल.

Infinix Hot 9 Pro

इनफिनिक्स हॉट 9 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा फोन 6.6 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करेल जो फुलएचडी+ स्क्रीन रेज्ल्यूशन सह येऊ शकतो. हॉट 9 प्रो एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल. फोन मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे. आशा आहे कि Infinix हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. हा फोन ब्लॅक, ब्लू, ग्रीन आणि पिंक कलर वेरिएंट सह बाजारात येईल.

Infinix Hot 9

Infinix Hot 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.6 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड आधारित आहे जो एक्सओएस 6 वर चालतो. फोन मध्ये प्रोसेसर कोणता देण्यात आला आहे हि माहिती अजून समोर आली नाही पण आशा आहे कि इनफिनिक्स हॉट 9 मध्ये मीडियाटेक हीलियो चिपसेट दिला जाऊ शकतो.

इंडोनेशिया मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. आशा आहे कि भारतात पण Infinix Hot 9 चा हा वेरिएंट लॉन्च केला जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix Hot 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या Infinix Hot 9 मध्ये प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल.

Infinix Hot 9 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. इंडोनेशिया मध्ये इनफिनिक्स हॉट 9 Rp 1,699,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 7,500 रुपये होतात. एवढे मात्र निश्चित आहे कि भारतात येणारा Infinix Hot 9 इंडोनेशियन वर्जन पेक्षा जास्त पावरफुल असेल, फोनच्या भारतीय लॉन्च डेटसाठी सध्या वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here