12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज असलेला हा स्वस्त 5G फोन Infinix Note 40X लाँच, जाणून घ्या माहिती

इंफिनिक्सने 5 ऑगस्टला आपला स्वस्त स्मार्टफोन Infinix Note 40X 5G लाँच केला आहे. ज्याची सेल 9 ऑगस्टपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु होत आहे. यामुळे जर तुम्ही एक स्वस्त फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. चला, पुढे किंमत, ऑफर आणि स्पेक्स सविस्तार जाणून घेऊया.

ब्रँडने Infinix Note 40X 5G ला दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केले आहे. डिव्हाईसच्या बेस मॉडेलची किंमत मात्र 14,999 रुपये आहे. तर टॉप मॉडेल 12 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज 15,999 रुपयांना आहे. फोनसाठी युजर्सना लाईम ग्रीन, पॉम ब्लू आणि स्टार लाईट ब्लॅक सारखे तीन कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.

Infinix Note 40X 5G वर ऑफर

  • Infinix Note 40X 5G मोबाईलला ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर विकला जात आहे.
  • ऑफर पाहता बँक कार्डवरून फोन घेतल्यावर तुम्हाला 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंटचा लाभ मिळेल.
  • जर तुम्ही EMI च्या माध्यमातून फोन घेणार आहात तर 1,500 रुपये पर्यंतचा डिस्काऊंट दिला जाईल.
  • फोनवर नो कॉस्ट EMI ची सुविधा पण आहे. यासाठी तुम्ही 3 ते 6 महिन्याचा पर्याय निवडू शकता.
  • ऑफरसह तुम्ही Infinix Note 40X 5G च्या बेस मॉडेलला 13,499 आणि टॉप मॉडेलला 14,999 रुपयांमध्ये घेऊ शकता.

Infinix Note 40X 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.78 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले
  • डायमेंसिटी 6300 चिपसेट
  • 12 जीबी रॅम+256 जीबी मेमरी
  • 108MP रिअर मेन कॅमेरा
  • 8 मेगापिक्सल फ्रंट लेन्स
  • 5000mAh बॅटरी
  • 10 5 जी बँड्स

डिस्प्ले: Note 40X 5G मध्ये 6.78 इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले आहे यावर 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट, 500 निट्स ब्राईटनेस, डायनॅमिक बार इंटरअ‍ॅक्टिव्ह युआय आणि पंच होल डिझाईन देण्यात आली आहे.

प्रोसेसर: मोबाईलमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट लावली आहे. जी 2.4GHz पर्यंतचे हाय क्लॉक स्पीड प्रदान करते.

रॅम आणि स्टोरेज: डिव्हाईसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम + 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा: Infinix Note 40X 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात AI टेक्नॉलॉजी असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा लेन्स क्वॉड LED फ्लॅशसह मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या मोठ्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी 18 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

इतर: इंफिनिक्स नोट 40 एक्स मध्ये मल्टी फंक्शन एनएफसी, फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय 5 ब्लूटूथ 5.2, ओटीजी सपोर्ट, चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी 10 5 जी बँड्स देण्यात आले आहेत.

ऑपरेटिंग सिस्टम: Infinix Note 40X 5G स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित XOS 14 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here