Realme GT Neo 6 SE फोनची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन आले समोर, लवकर होऊ शकते लाँचिंग

HIGHLIGHTS

  • रियलमी जीटी नियो 6 सीरिज लवकरच लाँच होऊ शकते.
  • यात GT Neo 6 आणि GT Neo 6 SE येऊ शकतात.
  • GT Neo 6 SE स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेटसह असू शकतो.

रियलमी काही दिवसांमध्ये आपली जीटी नियो 6 सीरिज लाँच करू शकतो. यानुसार Realme GT Neo 6 आणि Realme GT Neo 6 SE लाँच होऊ शकतात. परंतु अजून ब्रँडने कोणतीही माहिती अधिकृत केलेली नाही, याआधी सीरिजचे रियलमी जीटी नियो 6 एसईचे स्कीमॅटिक्स डिझाईन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. चला, पुढे या लीकमध्ये आलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Realme GT Neo 6 SE डिझाईन (लीक)

  • Realme GT Neo 6 SE फोनबद्दल टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने मायक्रो ब्लॉग्गिंग साईटवर माहिती शेअर केली आहे. यात स्कीमॅटिक्स डिझाईन आणि स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.
  • तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता की हा फोन आपल्या पूर्व मॉडेल नियो 5 एसई से मिळता-जुळता आहे.
  • फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा यूनिट दिसतो. त्याचबरोबर LED फ्लॅशसाठी पण जागा देण्यात आली आहे.
  • डिव्हाईसमध्ये पावर आणि वॉल्यूम बटन उजव्या साईडवर दिले आहेत. तसेच डीसीएसने सांगितलं आहे की फोन हलका आणि पातळ असू शकतो.

Realme GT Neo 6 SE चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • टिपस्टर नुसार फोनमध्ये परफॉरमेंससाठी स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेट दिली जाईल.
  • मोबाईलमध्ये जबरदस्त स्क्रीन एक्सपीरियंससाठी 8T LTPO AMOLED डिस्प्ले मिळू शकतो.
  • बॅटरीच्या बाबतीत हा मोबाईल 5500mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.

Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन

  • स्क्रीन: पूर्व मॉडेल Realme GT Neo 5 SE मध्ये 6.73-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. यावर 1.5K रिजॉल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट सादर करण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये चांगल्या युझर एक्सपीरियंससाठी ब्रँडने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 चिपसेट लावली आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत मोबाईल फोनमध्ये 16जीबी LPDDR5x रॅम आणि 1टीबी पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  • कॅमेरा: Realme GT Neo 5 SE फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: Realme GT Neo 5 SE पण नवीन मॉडेल प्रमाणे 5,500mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगसह सादर झाला होता.
  • ओएस: हा रियलमी मोबाईल फोन अँड्रॉइड 13 आधारित Realme UI 4 वर लाँच केला गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here