भारतीय नागरिकांची डिजिटल ओळख असलेला आधार कार्ड आज जवळपास प्रत्येक सरकारी आणि गैर-सरकारी संस्थेमध्ये पहिल्यांदा मागितला जातो. शाळा, दवाखाने यापासून मोबाईल सिम विकत घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आला आहे. आधार कार्ड ची ही अवश्यकते मुळे भरपूर मोबाईल ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. पण ज्या लोकांनी मोबाईल नंबर आधार कार्ड शी अजूनपर्यंत लिंक केला नाही त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. देशाचे टेलीकॉम सचिव ने सांगितले की मोबाईल सिम साठी आता आधार कार्ड आवश्यक नाही.
टेलीकॉम सचिव अरुण सुंदराजन ने आपल्या विधानात सांगितले की मोबाईल सिम घेण्यासाठी आता आधार कार्ड ची गरज नाही. अरुण सुंदराजन ने देशातील सर्व टेलीकॉम कंपन्यांना या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच मोबाईल नंबर आधार कार्ड शी जोडणाऱ्या विभागाने सांगितले की मोबाईल नंबर आधार शी लिंक करणे आता आवश्यक नाही.
सरकार ने मोबाईल आॅपरेटर्सना आदेश देऊन सांगितले आहे की नवीन सिम घेताना फक्त आधार कार्ड मागितले जाऊ नये. आधार कार्ड ऐवजी ग्राहक वोटर आईडी, पासपोर्ट व ड्राइविंग लाइसेंस इत्यादि पण देऊ शकतात आणि हे डाक्यूमेंट्स पण वैध असतिल.
सुप्रीम कोर्ट ने पण मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न केला आहे. लोकनीति फाउंडेशन ने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनवाई करताना सुप्रीम कोर्ट ने हे स्पष्ट केले आहे की जोपर्यंत सामन्या लोकांच्या हिताचा निर्णय होत नाही तोपर्यंत आधार कार्ड मोबाईल नंबर शी लिंक करणे आवश्यक नाही.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर टेलीकॉम सचिव यांच्या आदेशाने स्थानिक नागरिकांसह भारतात येणार्या परदेशी आणि एनआरआई लोकांना फायदा होईल. कारण आधार कार्ड नसल्यामुळे लोक सिम कार्ड विकत घेऊ शकत नव्हते.