Jio 4जी डाउनलोड स्पीड मध्ये पुन्हा अव्वल, बघा दुसऱ्या कंपन्यांची हालत

दूरसंचार नियामक ट्राई द्वारा मार्च महिन्यासाठी जारी केलेल्या ताजा आकड्यांनुसार सरासरी 4G डाउनलोड स्पीड मध्ये रिलायंस जियो ने पुन्हा बाजी मारली आहे. मार्च महिन्यात Jio चा सरासरी डाउनलोड स्पीड 22.2 एमबीपीएएस नोंदवण्यात आला, जो फेब्रुवारीच्या 20.9 एमबीपीएस स्पीड पेक्षा कितीतरी जास्त आहे.

सरासरी 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जियो ने आपल्या प्रतिस्पर्धी कंपनी एयरटेलला दुप्पटीपेक्षा जास्त अंतराने मात दिली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) द्वारा जारी आकड्यांनुसार, भारती एयरटेलचा डाउनलोड स्पीड फेब्रुवारीतील 9.4 एमबीपीएस वरून कमी होऊन मार्च मध्ये 9.3 एमबीपीएस झाला आहे. लागोपाठ दोन महिने एयरटेलचा 4जी डाउनलोड स्पीड कमी झाला आहे. वोडाफोन आणि आइडिया सेल्युलर चा व्यवहार एकत्र झाला आहे आणि ते आता वोडाफोन आइडिया म्हणून काम करत आहेत. पण ट्राई ने दोन्ही नेटवर्कचा डाउनलोड, अपलोड स्पीड वेगळा दाखवला आहे.

वोडाफोन नेटवर्कचा सरासरी 4 जी डाउनलोड स्पीड फेब्रुवारीत 6.8 एमबीपीएस होता. जो थोडा वाढून मार्च मध्ये 7.0 एमबीपीएस झाला आहे. तर एयरटेल प्रमाणे आइडियाचा 4जी डाउनलोड स्पीड पण कमी झाला आहे. फेब्रुवारीच्या 5.7 एमबीपीएस स्पीडच्या तुलनेत मार्च मध्ये हा कमी होऊन 5.6 एमबीपीएस झाला आहे.

मार्च मध्ये वोडाफोन ने पुन्हा एकदा सरासरी 4जी अपलोड स्पीड मध्ये नंबर एकचे स्थान कायम ठेवले. गेल्या महिन्यात कंपनीने आइडियाला नंबर दोन वर ढकलून नंबर एकचे स्थान मिळवले होते. वोडाफोनका 4जी अपलोड स्पीड मार्च महिन्यात 6.0 एमबीपीएस होता. गेल्या महिन्यात पण वोडाफोनचा अपलोड स्पीड 6.0 एमबीपीएस होता.

मार्च मध्ये आइडिया आणि एयरटेल नेटवर्कच्या सरासरी 4जी अपलोड स्पीड मध्ये थोडी घसरण दिसली. आइडिया चा 4जी अपलोड स्पीड 5.5 एमबीपीएस आणि एयरटेल की 3.6 एमबीपीएस होता. सरासरी 4जी डाउलोड स्पीड प्रमाणे जियो ने सरासरी 4जी अपलोड स्पीड मध्ये पण सुधारणा केली आहे. मार्च महिन्यात जियोचा 4जी अपलोड स्पीड 4.6 एमबीपीएस ओटा जो आधीच्या महिन्यात 4.5 एमबीपीएस होता.

विशेष म्हणजे ट्राई सरासरी स्पीडची तुलना ज्या आकड्यांच्या आधारवर करते ते ट्राईच्या माईस्पीड ऍप्लिकेशनचा मदतीने गोळा केले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here