Infinix Zero 40 5G ची माहिती आली समोर, फोन झाला गीकबेंच आणि एफसीसी साईटवर लिस्ट

इंफिनिक्स Zero 30 च्या यशानंत Infinix Zero 40 5G ला लवकरच सादर केले जाऊ शकते. परंतु ब्रँडने फोन बाबत कोणतीही माहिती दिली नाही, मात्र याला गीकबेंच आणि Federal Communications Commission (एफसीसी) सर्टिफिकेशन साईटवर स्पॉट करण्यात आले आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशन आणि डिझाईनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

Infinix Zero 40 5G गीकबेंच लिस्टिंग

  • Infinix Zero 40 5G मॉडेल नंबर X6861 सह गीकबेंच साईटवर दिसला आहे.
  • फोनने सिंगल-कोर मध्ये 1096 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 3274 स्कोर केला आहे.
  • लिस्टिंगवरून संकेत मिळतो येणारा हा इंफिनिक्स फोन MediaTek Dimensity 8200 चिपसेटसह असू शकतो.
  • गीकबेंच प्लॅटफॉर्मनुसार Infinix Zero 40 5G मध्ये जवळपास 12GB पर्यंत रॅम मिळण्याची चर्चा आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत हा मोबाईल Android 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.

Infinix Zero 40 5G एफसीसी लिस्टिंग

  • Infinix Zero 40 5G ला एफसीसीवर पण मॉडेल नंबर X6861 सह स्पॉट करण्यात आले आहे.
  • तुम्ही खाली फोटोच्या आयडी लेबल मध्ये पाहू शकता की झिरो 40 5G मध्ये जवळपास 12GB रॅम दिली जाऊ शकते.
  • डिव्हाईसमध्ये कमीत कमी 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज लावले जाऊ शकते.
  • नवीन इंफिनिक्स डिव्हाईस पोलर ब्लॅक कलरमध्ये सादर केले जाऊ शकते. तर लाँचच्या वेळी आणि पण स्टोरेज आणि कलर येऊ शकतात.

Infinix Zero 40 5G ची डिझाईन (एफसीसी लिस्टिंग)

  • फोनच्या रिअर पॅनलवर एक एलईडी फ्लॅशसह गोल कॅमेरा मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा दिसला आहे.
  • रिअर पॅनलच्या टॉप लेफ्ट कार्नर मध्ये एक आणि कटआऊट आहे, मात्र हे स्पष्ट नाही की या कशासाठी देण्यात आले आहे.
  • लिस्टिंगवरून समजले आहे की हे मॉडेल 164 x 74 x 8 मिमी डायमेंशन असू शकते.

तसेच नवीन झिरो 40 5 जी किंमतच्या बाबतीत पूर्व मध्ये सादर केलेल्या झिरो 30 च्या आसपासच्या रेंजमध्ये येऊ शकतो. तसेच झिरो 30 5 जी च्या 8GB+256GB मॉडेलची किंमत 23,999 आणि 12GB+256GB चे 24,999 रुपये होते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here