Infinix Zero Flip गुगल प्ले कंसोलवर स्पॉट, स्पेसिफिकेशन आले समोर

इंफिनिक्स या दिवसांपासून आपल्या फोल्ड होणाऱ्या स्मार्टफोनवर काम करत आहे. हा Infinix Zero Flip नावाने भारतासह ग्लोबल बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. याआधी डिव्हाईसला बीआईएस, एफसीसी, एनबीटीसी सारख्या प्लॅटफॉर्मवर पाहिले गेले आहे. तसेच, आता हा गुगल प्ले कंसोल साईटवर समोर आला आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. चला, पुढे लेटेस्ट लिस्टिंग आणि इतर माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Infinix Zero Flip गुगल प्ले कंसोल लिस्टिंग

  • इंफिनिक्सचा नवीन हँडसेट मॉडेल नंबर X6962 सह गुगल प्ले कंसोल साईटवर स्पॉट झाला आहे.
  • गुगल प्ले कंसोलवर मोठी गोष्ट पाहिले गेली आहे, फोनचा चिपसेट कोडनेम MediaTek MT6891Z/CZA आहे, जो MediaTek Dimensity 1100 असू शकतो.
  • ही पण आशा आहे की फोनमध्ये लाँचच्या वेळी MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर मिळू शकतो. हा Dimensity 1100 चा रिब्रँडेड व्हर्जन आहे.
  • वरती दिलेले दोन्ही चिपसेट एक कोर आर्किटेक्चर शेअर करत आहेत. ज्यात 4x ARM Cortex-A78 कोर (2600 मेगाहर्ट्सवर क्लॉक्ड) आणि 4x ARM Cortex-A55 कोर (2000 मेगाहर्ट्सवर क्लॉक्ड) चा समावेश आहेत.
  • लिस्टिंगमध्ये GPU बद्दल माहिती आहे की Infinix Zero Flip मध्ये माली G57 दिला जाऊ शकतो.
  • इंफिनिक्सच्या आगामी फोनमध्ये 480 DPI च्या पिक्सल डेनसिटीसह 1080 x 2640 पिक्सल रिजॉल्यूशन असणारी स्क्रीन मिळू शकते.
  • डिव्हाईस जवळपास 8GB रॅमसह येऊ शकतो तर ओएसच्या बाबतीत Android 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.

Infinix Zero Flip चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Infinix Zero Flip मोबाईलमध्ये 6.x” फ्लॅक्सिबल एलटीपीओ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • स्टोरेज आणि रॅम: डेटा सेव्ह करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह एंट्री घेऊ शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता Infinix Zero Flip स्मार्टफोनमध्ये ड्युअल एक्सटर्नल कॅमेरा आणि सिंगल इनर कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी आणि चार्जिंग: टीयूवी लिस्टिंगमुळे संकेत मिळतो की डिव्हाईसमध्ये ड्युअल बॅटरी सेटअप दिली जाऊ शकते. ज्यात 3410 एमएएच आणि 1180 एमएएचची क्षमता असू शकते जो एकूण 4590 एमएएच साईज मध्ये मिळण्याची संभावना आहे. तसेच, यात 70W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
  • ओएस: Infinix Zero Flip च्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा अँड्रॉईड 14 आधारित असू शकतो.

शेवटी तुम्हाला सांगतो की पूर्व लीकनुसार Infinix Zero Flip जवळपास 50,000 रुपयांच्या रेंजमध्ये येऊ शकतो. तसेच, पुढे पाहायचे आहे की ब्रँड द्वारे याची अधिकृत माहिती कधी समोर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here