स्मार्टफोन्सचा स्टॉक संपवण्यासाठी Redmi चा क्लीयरेंस सेल, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळवा Redmi 6A

Mi Clearance sale: चीनी स्मार्टफोन कंपनी Redmi नं कोणताही गाजावाजा न करता आपल्या स्मार्टफोन्सचा क्लीयरेंस सेल सुरु केले आहे, ज्यात एकूण 30 फोन अत्यंत कमी किंमतीत विकले जात आहेत. या सेलमध्ये विकले जाणारे काही Redmi फोन्स 3-4 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले आहेत. Redmi Clearance सेलमध्ये Redmi Note 3 सारखे फोन पासून अलीकडेच आलेल्या Redmi Note 10 वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. परंतु, महत्वाची बाब म्हणजे Note 10 सीरीज व्यतिरिक्त बाकी सर्व फोन्सवर कोणतीही वॉरंटी किंवा असिस्टंट सपोर्ट मिळणार नाही. परंतु, तुम्ही फक्त 3,999 रुपयांमध्ये Redmi 6A फोन घेऊ शकता.

Mi Clearance sale

कंपनीनं या सेलबद्दल म्हटलं आहे की जर तुम्ही रेडमीच्या विंटेज मॉडेलचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर हे डिवाइसेस विकत घेऊ शकता. फोन पूर्णपणे रेडमी पॅकेजिंगसह येतील. जर तुम्हाला रेडमीच्या क्लीयरेंस सेलमध्ये एखादा फोन विकत घेऊ इच्छित असाल तर पुढे आम्ही त्या डिवाइसेसची माहिती दिली आहे, ज्यावर मोठी सूट मिळत आहे. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त 5G फोन 7 नोव्हेंबरला होईल लाँच; 50MP कॅमेऱ्यासह मिळणार 7GB रॅम, जाणून घ्या किंमत

क्लीयरेंस सेलमध्ये डिस्काउंटसह मिळत आहेत विंटेज रेडमी स्मार्टफोन

6,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या हे फोन्स

1. Redmi 6A – 3,999 रुपये

2. Redmi 5A – 4,499 रुपये

3. Redmi 5 – 4,499 रुपये

4. Redmi 4 – 4,499 रुपये

5. Redmi 6 Pro 4,499 रुपये

6. Redmi 8A – 4,499 रुपये

7. Redmi 7A – 4,499 रुपये

8. Redmi 7 – 4,999 रुपये

9. Redmi Note 4 – 4,999 रुपये

10. Redmi Note 3 – 4,999 रुपये

11. Redmi Y2 – 4,999 रुपये

12. Redmi Y1 Lite – 4,999 रुपये

13. Redmi 8A Dual – 5,499 रुपये

14. Redmi Y3 – 5,999 रुपये

15. Redmi 6 – 5,999 रुपये

16. Redmi Note 7 Pro – 5,999 रुपये

17. Redmi Note 7 – 5,999 रुपये

हे देखील वाचा: जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी मोठ्या बॅटरीसह Nokia 2780 Flip 4G फोन लाँच; पाहा किंमत

6,000 रुपये ते 8,000 रुपयांमध्ये विकत घ्या हे फोन्स

18. Redmi Note 8 – 6,499 रुपये

19. Redmi Note 7S – 6,999 रुपये

20. Redmi 8 – 6,999 रुपये

21. Redmi Note 9 – 7,499 रुपये

22. Redmi Note 5 Pro – 7,999 रुपये

8,000 रुपये ते 10,000 रुपयांमध्ये विकत घ्या हे फोन्स

23. Redmi Y1 – 8,999 रुपये

10,000 रुपये ते 12,000 रुपयांमध्ये विकत घ्या हे फोन्स

24. Redmi Note 6 Pro – 10,999 रुपये

25. Redmi Note 10 – 10,999 रुपये

26. Redmi Note 9 Pro – 10,999 रुपये

27. Redmi Note 9 Pro Max – 11,999 रुपये

12,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकत घ्या हे फोन्स

28. Redmi Note 8 Pro – 12,999 रुपये

29. Redmi K20 – 14,999 रुपये

30. Redmi K20 Pro – 17,999 रुपये

Note: सेलसाठी सादर करण्यात आलेले मॉडेल्स स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध होतील. ही बातमी लिहिताना सर्व फोन स्टॉकमध्ये होते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here