15 हजारांच्या बजेटमध्ये Infinix Hot 20 5G फोन आणि स्वस्त Infinix Hot 20 Play देखील येतोय बाजारात

बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या इनफिनिक्स कंपनीच्या भारतीय चाहत्यांसाठी खुखबर आली आहे. इनफिनिक्स कंपनी भारतीय बाजारात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करण्याची तयारी करत आहे आणि लवकरच Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G फोन भारतात लाँच केले जाऊ शकतात. Infinix Hot 20 series अंतगर्त Infinix Hot 20 5G आणि Hot 20 Play सह Hot 20 4G, Hot 20s तसेच Hot 20i याआधी आंतरराष्ट्रीय बाजारात आले आहेत आणि आता यातील इनफिनिक्स हॉट 20 5जी आणि हॉट 20 प्ले भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.

Infinix Hot 20 5G भारतीय लाँच

इनफिनिक्स हॉट 20 5जी आणि इनफिनिक्स हॉट 20 प्ले इंडिया लाँचचा दावा फोनएरिना वेबसाइटनं केला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की इनफिनिक्स कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करणार आहे जे 30 नोव्हेंबरला लाँच होतील. रिपोर्टनुसार Infinix Hot 20 5G मध्ये 12 5G bands चा सपोर्ट मिळेल. आम्हाला आशा आहे की Infinix Hot 20 5G Price 15 हजारांच्या बजेटमध्ये भारतीयांच्या भेटीला येईल. हे देखील वाचा: Kawasaki नं सादर केल्या दोन दणकट इलेक्ट्रिक बाइक; जबरदस्त लूकवर तुम्हीही व्हाल फिदा

Infinix Hot 20 5G चे स्पेसिफिकेशन्स

इनफिनिक्स हॉट 20 5जी फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईलचा वापर करून बनवण्यात आला आहे ज्यात तीन बेजल लेस कडा आणि चिन पार्ट आहे.

Infinix Hot 20 5G अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 10.6 वर चालतो, ज्यात ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा इनफिनिक्स मोबाइल 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे तसेच 3जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये फेस चेंजिंग कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा भारतातील सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जवर 160KM ची रेंज

50MP camera Infinix Hot 20 5G launched under 15000 price check specifications

फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 20 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 50MP Samsung JN1 प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Infinix Hot 20 5G मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here