
अॅमेझॉनचा वार्षिक शॉपिंग उत्सव म्हणजे Prime Day सेल येत्या 15 जुलैला भारतात सुरु होणार आहे. हा दोन दिवसांचा सेल असेल ज्यात ग्राहकांना स्मार्टफोन्ससह अनेक प्रोडक्टसवर भरगोस डिस्काउंट मिळेल. फोन्सवरील ऑफर्समध्ये ग्राहकांना iPhone वरील ऑफर्सची आतुरता असते. यंदाही अॅमेझॉननं iPhone 14 वर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे.
iPhone 14 वरील डिस्काउंट
अॅमेझॉन इंडियानं कन्फर्म केलं आहे की iPhone 14 प्राइम डे 2023 च्या सेलमध्ये 66,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ही डिस्कॉउंटेड प्राइस फोनच्या 128जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची आहे. ज्यात आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या 10% डिस्काउंटचा देखील समावेश आहे.
iPhone 14 (128GB) जेव्हा लाँच झाला होता तेव्हा ह्याची किंमत 79,900 रुपये होती आणि अधिकृत वेबसाइटवर देखील हीच किंमत आहे. गेल्या महिन्यात अॅमेझॉनवर iPhone 14 67,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता, त्यामुळे आगामी सेलमध्ये सध्याच्या जेनरेशनच्या आयफोनवर मोठा डिस्काउंट मिळेल हे नक्की. त्याचबरोबर अॅमेझॉन iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max वरील डिस्काउंट देखील टीज करत आहे.
iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले : Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्लिम बेजल्स, HDR, 1200nits ब्राइटनेस, फेस आयडी सेन्सर आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.














