IPL 2023: यंदा मोफत बघता येणार आयपीएलचे सर्व सामने; आत्ताच डाउनलोड करा ‘हे’ अ‍ॅप

Highlights

  • IPL 2023 यावर्षी 20 मार्च ते 28 मे 2023 दरम्यान आयोजित केली जाईल.
  • Jio Cinema अ‍ॅप वर IPL च्या 16 व्या हंगामातील सर्व सामने दाखवले जातील.
  • Jio TV अ‍ॅप वर IPL 2023 स्ट्रीम केली जाणार नाही.

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या शुभारंभाला आता काहीच दिवस उरले आहेत. लवकरच या सीजनच्या शेड्यूलची ऑफिशियल घोषणा केली जाईल. तुम्हाला माहित असेल की यावेळी आयपीएलचे स्ट्रीमिंग राइट्स जियो टीव्हीला देण्यात आले आहेत. म्हणजे यावेळी आयपीएलचे सर्व सामने जियो युजर्ससाठी मोफत असतील. रिपोर्ट्सनुसार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनं जियोला आयपीएल लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची परवानगी दिली आहे. याआधी आयपीएलच्या लाइव्ह टेलिकास्टचे अधिकार हॉट स्टारकडे होते.

IPL 2023

रिपोर्ट्स नुसार Jiocinema अ‍ॅपवर कथितरित्या IPL 2023 चे सर्व सामने 11 वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये स्ट्रीम केले जातील. एक्सचेंज4मीडियाच्या एक रिपोर्टनुसार, Sports18 नं देखील Jio TV अ‍ॅप वर IPL 2023 मोफत प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु Sports18 च्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. हे देखील वाचा: 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo चा 5G Phone लाँच; रेडमी-रियलमीची वाट लावणार का Oppo Reno 8T 5G?

सध्या वायकॉम18 कडे 2027 पर्यंत आयपीएलचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार आहेत, ज्यासाठी 23,578 कोटी रुपये देण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार Viacom18 आयपीएल 2023 मोफत स्ट्रीम करण्याचा पर्याय क्रिकेट प्रेमींना देऊ शकतं. त्यामुळे Jio Cinema अ‍ॅपवर IPL 2023 मोफत स्ट्रीम करता येऊ शकते. अलीकडेच या अ‍ॅपवर फुटबॉल विश्व चषक अर्थात फीफा 2022 चे सामने मोफत स्ट्रीम करण्यात आले होते.

आयपीएल गेली अनेक वर्ष डिज्नी+ हॉटस्टारच्या माध्यमातून लाइव्ह टेलीकास्ट केली जात आहे. ज्यासाठी 2018 मध्ये स्टार इंडियानं 16,347 कोटी रुपये दिले होते आणि डिजिटल आणि टीव्ही अधिकार मिळवले होते. परंतु यंदा टीव्ही आणि डिजिटलचे अधिकार वेगवेगळे करण्यात आले आहेत, ज्यामुळे स्टार इंडियाला डिजिटल अधिकार मिळाले नाहीत. परंतु टीव्ही अधिकार अजूनही स्टार इंडियाकडे आहेत, त्यामुळे केबल किंवा सॅटेलाइट टीव्हीवर तुम्हाला आयपीएल 2023 बघायची असेल तर स्टार स्पोर्ट्स चॅनलची मदत घ्यावी लागेल. हे देखील वाचा: Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV

IPL 2023 मुळे वाढतील Jio Cinema subscribers

भारतीय ओटीटी सेगमेंटमध्ये, डिज्नी+ हॉटस्टारनं अलीकडेच एक महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे आणि आयपीएलच्या प्रेक्षकांमुळे हॉटस्टारकडे बाजारातील 50 टक्के हिस्सा आहे. परंतु Jio Cinema अ‍ॅप कथितरित्या IPL 2023 च्या सामान्यांचे मोफत स्ट्रीमिंग करता आल्यास Hotstar ला जवळपास 15-25 मिलियन ग्राहक गमवायला लागू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here