iQOO 11 series 2 डिसेंबरला टेक मार्केटमध्ये लाँच होणार होती, परंतु former Chinese President Jiang Zemin यांच्या निधनानंतर अनेक टेक कंपन्यांनी आपले लाँच पुढे ढकलले, त्यात आयकू 11 सीरीजचा देखील समावेश होता. चायना लाँच टळल्यानंतर आता ही स्मार्टफोन सीरीज इंडोनेशियाच्या माध्यमातून टेक मंचावर येईल. कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू 11 सीरीज 8 डिसेंबरला इंडोनेशियामध्ये लाँच होईल आणि या दिवशी iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro 5G हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात येतील.
iQOO 11 5G कधी होणार लाँच
iQOO 11 5G 8 डिसेंबरला इंडोनेशिया मध्ये लाँच होईल. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयकू 11 सीरीज लाँच टीज केला आहे. ही स्मार्टफोन सीरीज 8 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता टेक मंचावर एंट्री घेईल म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी. विशेष म्हणजे कंपनीनं आपल्या टीजरमध्ये फक्त आयकू 11 5जी फोनचा उल्लेख केला आहे, त्यामुळे कदाचित 8 डिसेंबरला फक्त iQOO 11 5G फोन लाँच होईल आणि iQOO 11 Pro 5G फोन येणार नाही. हे देखील वाचा: 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यावर घरी आणा 64MP कॅमेरा असलेला Oppo स्मार्टफोन; अशी आहे ऑफर
iQOO 11 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
आयकू 11 पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा ई6 अॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी iQOO 11 5G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असेल जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.
iQOO 11 5G Phone मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Samsung GN5 प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सल पोर्टरेट टेलीफोटो लेन्स मिळू शकते. लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 16 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो, जोडीला 512 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.
iQOO 11 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
आयकू 11 प्रो मध्ये पण आयकू 11 5जी फोनमध्ये असलेला चिपसेट म्हणजे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळेल तसेच हा मोबाइल फोन पण 16 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार या आयकू मोबाइलमध्ये 6.78 इंच ई6 अॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो पंच होल स्टाईलसह येईल तसेच क्यूएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या
फोटोग्राफीसाठी आयकू 11 प्रो स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50MP Sony IMX866 प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 14.6 मेगापिक्सल टेलीफोटो सेन्सर असल्याच लीकमध्ये समोर आलं आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी iQOO 11 Pro मध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.