iQOO 11S चे स्पेसिफिकेशन्स लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights

  • iQOO 11S July आणि September दरम्यान येऊ शकतो आहे.
  • Snapdragon 8 Gen 2 मिळू शकतो फोनमध्ये.
  • ह्या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा असू शकतो.

चीनी स्मार्टफोन निर्माता iQOO आपल्या 11 सीरीजमधून एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याची प्लॅनिंग करत आहे. कंपनीनं अजूनतरी फोन बाबत कोणतीही माहिती शेयर केली नाही. परंतु, रिपोर्ट्सनुसार अपकमिंग iQOO 11S स्मार्टफोन 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तसेच ऑफिशियल लाँचपूर्वीच टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती शेयर केली आहे. चला त्यावर एक नजर टाकूया.

आयकू 11एस चे लीक स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : ह्यात 6.78-इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले 2K रेजोल्यूशन आणि हाय 144Hz रिफ्रेश रेट असू शकतो.

कॅमेरा : V2 ISP इमेजिंग सिस्टमसह 50MP मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो. सध्या फ्रंट कॅमेऱ्याची माहिती समोर आली नाही.

चिपसेट : फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली जाऊ शकते.

रॅम व स्टोरेज : कंपनी 8GB रॅम आणि 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन देऊ शकते.

बॅटरी : 200W पावरसह फोनमध्ये मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

नोट : ही सर्व माहिती टिपस्टरच्या टिपवर आधारित आहेत. परंतु कंपनीनं ह्या फोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

कधी बाजारात येऊ शकतो आयकू 11एस

iQOO 11S साल 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत सादर केला जाऊ शकतो. ज्याचा अर्थ असा की कंपनी जुलै आणि सप्टेंबर दरम्यान हा स्मार्टफोन लाँच करू शकते. परंतु स्मार्टफोनच्या भारतीय लाँच बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सर्वप्रथम हा फोन चीनमध्ये येईल मग इतर देशांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

यंदा जानेवारीत कंपनीनं भारतात iQOO 11 लाँच केला होता, जो आधी डिसेंबर 2022 मध्ये चीनमध्ये आला होता. ह्या फोनमध्ये 6.78-इंच QHD+ डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen2 चिपसेट, Android 13, 512GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन सारखे स्पेसिफिकेशन्स आहेत. स्मार्टफोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आणि टॉप-अँड 16GB+256GB व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here