विसरून जा सॅमसंग आणि सोनी ला, शाओमी ने लॉन्च केले 3 नवीन स्मार्ट टीवी

शाओमी इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला दमदार दबदबा निर्माण केला आहे. देशातील स्मार्टफोन बाजाराच्या एका मोठ्या हिस्स्यावर शाओमी राज्य करत आहे. आता कंपनीचे पुढील टारगेट टेलीविजन बाजार आहे. आधीच कंपनी ने स्मार्टटीवी सादर करून सॅमसंग, सोनी व एलजी सारख्या कंपन्यांना टक्कर दिली आहे. तसेच आता शाओमी इंडिया ने तीन नवीन स्मार्टटीवी पुन्हा भारतात आणल्या आहेत. शाओमी ने मी एलईडी टीवी 4 प्रो (55), मी एलईडी टीवी 4ए प्रो (49) आणि मी एलईडी टीवी 4सी प्रो (32) लॉन्च केल्या आहेत.

मी एलईडी टीवी 4 प्रो (55)
मी एलईडी टीवी 4 प्रो (55) मध्ये 3840 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 55-इंचाचा 4के एचडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्ट टीवी मध्ये 2जीबी रॅम तसेच 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे सोबतच ही 64बिट एमलॉजिक क्वॉड-कोर चिपसेट वर चालते. तसेच ग्राफिक्स साठी या मी एलईडी टीवी 4 प्रो मध्ये माली-टी830 जीपीयू आहे. या टीवी मध्ये तुम्हाला डुअल बँड वाईफाई व ब्लूटूथ सह 3 एचडीएमआई पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट पण मिळतील. उत्तम साउंड क्वॉलिटी साठी टीवी मध्ये 16वॉल्ट स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत जे डीटीएस-एचडी सराउंड साउंडला सपोर्ट करतात.

मी एलईडी टीवी 4ए प्रो (49)
मी एलईडी टीवी 4ए प्रो (49) मध्ये 1920 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 49-इंचाचा फुलएचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या टीवी मध्ये पण 2जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल स्टोरेज आहे तसेच ही 64बिट एमलॉजिक क्वॉड-कोर चिपसेट वर चालते. ग्राफिक्स साठी मी एलईडी टीवी 4ए प्रो मध्ये माली-टी450 जीपीयू देण्यात आला आहे. या टीवी मध्ये वाईफाई व ब्लूटूथ सह 3 एचडीएमआई पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत तसेच संगीताचा आनंद घेण्यासाठी डीटीएस-एचडी सराउंट साउंड सपोर्ट वाले 20वॉल्ट चे स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत.

मी एलईडी टीवी 4सी प्रो (32)
मी एलईडी टीवी 4सी प्रो (32) शाओमी ने 1368 x 768 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 32-इंचाच्या एचडी डिस्प्ले सह सादर केली आहे. या टीवी मध्ये 1जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. मी एलईडी टीवी 4ए प्रो (49) प्रमाणे ही टीवी पण 64बिट एमलॉजिक क्वॉड-कोर चिपसेट वर चालते तसेच ग्राफिक्स साठी यात माली-टी450 जीपीयू देण्यात आला आहे. या टीवी मध्ये पण वाईफाई व ब्लूटूथ सोबत 3 एचडीएमआई पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत त्याचबरोबर यात डीटीएस-एचडी सराउंट साउंड सपोर्ट वाले 20वॉल्ट चे स्टीरियो स्पीकर्स पण आहेत.

शाओमी चे हे तिन्ही स्मार्टटीवी एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम सोबत शाओमी च्या पॅचवॉल वर चालतात. या तिन्ही टेलीविजन मध्ये गूगल प्ले स्टोर मधून अॅप्स इंस्टाल पण करता येतात त्याचबरोबर यूट्यूब व गूगल प्ले चा पण वापर करता येतो. प्रो सीरीज च्या या तिन्ही टेलीविजन मध्ये क्रोमकॉस्ट आहे तसेच यूजर्स यात नेट​फ्लिक्स, अमेजॉन प्राइम , वूट, झी5, हॉटस्टॉर, हंगामा असे 14 कटेंट प्लॅटफार्म वापरू शकतात.

किंमत :
मी एलईडी टीवी 4सी प्रो (32) = 14,999 रुपये
मी एलईडी टीवी 4ए प्रो (49) = 29,999 रुपये
मी एलईडी टीवी 4 प्रो (55) = 49,999 रुपये

शाओमी मी एलईडी टीवी 4ए प्रो (49) आणि मी एलईडी टीवी 4सी प्रो (32) 9 ऑक्टोबर पासून मी डॉट कॉम सह अमेजॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होतील. तर मी एलईडी टीवी 4 प्रो (55) 10 ऑक्टोबर पासून फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here