iQOO चा पहिला 5G फोन वेबसाइट वर झाला लिस्ट, 12 जीबी रॅम सह फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर

iQOO आता Vivo चा सब-ब्रँड बनून नाही तर एक स्वतंत्र ब्रँड म्हणून काम करेल. iQOO ने गेल्या महिन्यात सांगितले होते कि ब्रँड अंतगर्त लॉन्च होणारे स्मार्टफोन्स आता वीवो मध्ये राहणार नाहीत आणि कंपनी फेब्रुवारी मध्ये आपला पहिला स्मार्टफोन बाजारात आणेल. कालच आईक्यू चे डायरेक्टर गगन अरोडा यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून माहिती दिली आहे कि कंपनी लवकरच भारतात आपला 5जी फोन घेऊन येणार आहे आणि हा मोबाईल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह येईल. तसेच आता iQOO चा हा आगामी स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे ज्यावरून फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

iQOO ने अजूनपर्यंत आपल्या आगामी 5G फोनचे नाव सांगितले नाही पण टेक विश्वात चर्चा आहे कि हा मोबाईल iQOO 3 नावाने बाजारात येईल. काही दिवसांपूर्वी या फोनचा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला होता ज्यात iQOO 3 च्या डिजाईनची माहिती मिळाली होती. आता हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. टेना लिस्टिंग मध्ये कथित iQOO 3 चे स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

iQOO च्या आगामी स्मार्टफोन टेना वर V1955A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे कि हा डिवाईस आईक्यू 3 असू शकतो. अशी माहिती समोर आली आहे कि हा डिवाईस 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार iQOO 3 मध्ये 20:9 चा आस्पेक्ट रेशियो मिळेल आणि या फोनचा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल.

टेना वर V1955A म्हणजे iQOO 3 चे डायमेंशन 158.51 x 74.88 x 9.16एमएम आणि वजन 214.5 ग्राम सांगण्यात आले आहे. आईक्यू 3 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे जो 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. लीकनुसार iQOO 3 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 12 जीबी रॅम, 8 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम मिळेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन बाजारात 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज वर सेल साठी उपलब्ध होऊ शकतो.

iQOO 3 एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,410एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबत फोन मध्ये 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. लीक झालेल्या आईक्यू 3 च्या फोटो वरून समजले होते कि हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जो Sony IMX686 किंवा Samsung GW1 सेंसर असेल.

तसेच iQOO 3 मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या दोन इतर कॅमेरा सेंसर्सची माहिती पण समोर आली आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. iQOO च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि liquid कूलिंग टेक्नोलॉजी दिली जाईल ज्याची माहिती कंपनीने टीजर मध्ये पण दिली आहे. तरीही फोनची लॉन्च डेट आणि ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here