भारतातील पहिला 5G Phone या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, iQOO ने केला टीज

iQOO ब्रँड टेक कंपनी Vivo पासून वेगळा झाला आहे आणि आता एक स्वतंत्र ब्रँडच्या रूपात काम करेल. iQOO ब्रँड अंतर्गत लॉन्च होणारे स्मार्टफोन्स आता वीवो मध्ये राहणार नाहीत आणि कंपनी लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टफोन आणेल. मागे बातमी आली होती कि कंपनी फेब्रुवारी महिन्यात आपला फ्लॅगशिप डिवाईस भारतीय बाजारात आणेल. आता iQOO ने स्वतः घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपल्या बॅनरचा पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे आणि यापेक्षा मोठी बाब अशी कि आईक्यू द्वारे लॉन्च केला जाणारा हा स्मार्टफोन एक 5G Phone असेल.

iQOO ने आपल्या अधिकृत ट्वीटर वर काल रात्री ट्वीट करून आगामी फोनची माहिती दिली आहे. आईक्यू ने स्पष्ट केले आहे कि कंपनी भारतात आपला 5G फोन घेऊन येणार आहे. कंपनीने स्पष्ट केले नाही कि ब्रँडच्या या 5जी फोनचे नाव काय असेल आणि कधी हा बाजारात येईल. पण iQOO च्या ट्वीट नंतर स्पष्ट झाले आहे कि कंपनी भारतात 5जी ची सुरवात करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. तसेच आईक्यू ने जर फेब्रुवारी महिन्यात आपला हा आगामी फोन सादर केला तर iQOO भारतातील पहिला 5G फोन घेऊन येणारा ब्रँड बनेल. विशेष म्हणे आपल्या ट्वीट मध्ये कंपनीने हॅशटॅग #MonsterInside चा वापर केला आहे जो सांगतो कि कंपनीचा आगामी फोन हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेला एक पावरफुल फ्लॅगशिप फोन असेल.

येईल स्नॅपड्रॅगॉन 865 सह

iQOO ने आता आपल्या ब्रँड अंतर्गत लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा तर केला नाही पण कंपनीने स्पष्ट केले होते कि या आगामी स्मार्टफोनच्या माध्यमातून आईक्यू फ्लॅगशिप सेग्मेंट टारगेट करेल. iQOO ने असे पण सांगितले होते कि ब्रँडचा हा आगामी स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर लॉन्च केला जाईल. म्हणजे ब्रँडचा हाच फोन 5G कनेक्टिविटी सह बाजारात येईल.

पावरफुल गेमिंग परफॉर्मेंस सह असेल मोठी बॅटरी

iQOO नुसार कंपनी आपले स्मार्टफोन्स मोबाईल गेमिंगच्या हिशोबाने बनवेल. ब्रँडच्या फोन मध्ये एकीकडे पावरफुल प्रोसेसर असेल तसेच गेमिंगच्या चाहत्यांसाठी हि कंपनी फोन मध्ये खास गेमिंग फीचर्स व मोड पण देईल. त्याचबरोबर iQOO चे असे म्हणणे आहे कि ब्रँडचे स्मार्टफोन्स भारतात बेस्ट बॅटरी टेक्नोलॉजी सह येतील. त्यामुळे आशा आहे कि iQOO स्मार्टफोन्स मध्ये जास्त एमएएच असलेली बॅटरी दिली जाऊ शकते तसेच कंपनी आपले आगामी स्मार्टफोन्स फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात आणू शकते.

ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर असेल लक्ष

iQOO नुसार कंपनी भारतातील ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर आपले स्मार्टफोन्स उपलब्ध करेल. कदाचित फोन लॉन्च नंतर लगेचच iQOO स्मार्टफोन फक्त ऑनलाईन शॉपिंग साइट्स वर सेलसाठी उपलब्ध होतील तसेच काही दिवसानंतर ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर आपले फोन्स विकेल. विशेष म्हणजे iQOO के स्मार्टफोन्स ‘मेक इन इंडिया’ असतील तसेच कंपनी बेंगळुरू मधून आपला बिजनेस आणि मॅन्युफॅक्चरिंग सांभाळेल.

iQOO ने सांगितले होते कि कंपनी फेब्रुवारी मध्ये भारतात एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून जगासमोर आईक्यू ब्रँडचा पहिला स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. कंपनीने सांगितले आहे कि फेब्रुवारी मध्ये आयोजित होणारा ईवेंट ब्रँडचा ग्लोबल ईवेंट असेल आणि भारतीय बाजाराच्या माध्यमातून iQOO का स्मार्टफोन टेक विश्वात पाऊल टाकेल. हा फोन सर्वात आधी भारतात लॉन्च केला जाईल आणि त्यानंतर जगातील इतर बाजारांत एंट्री घेईल. आईक्यू ने अजूनही स्पष्ट केले नाही कि कंपनी फेब्रुवारी मध्ये किती स्मार्टफोन्स लॉन्च करेल आणि यातील एखाद्या डिवाईस मध्ये 5जी कनेक्टिविटी असले असे देखील सांगितले नाही. पण अशी चर्चा आहे कि येत्या काही दिवसांत iQOO 3 आणि iQOO 3 Neo नावाने स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here