Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी?

Highlights

  • Nothing Phone (2) 2023 च्या उत्तरार्धात लाँच होईल.
  • कार्ल पेई अमेरिकन बाजारला प्राधान्य देणार.
  • Nothing Phone (2) पहिल्या फोनपेक्षा जास्त प्रीमियम असेल.

Nothing Phone (2) ची तयारी कंपनीनं सुरु केली आहे आणि हा फोन 2023 च्या उत्तरार्धात लाँच केला जाईल, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी म्हटलं होतं की नथिंग फोन (1) चा उत्तराधिकारी सादर करण्याची कंपनीला कोणतीही घाई नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की नथिंग फोन (2) कधीच येणार नाही असं नाही, असं देखील पेई म्हणाले. ब्रँडला नवा स्मार्टफोन लाँच करण्यासाठी वेळ घ्यायचा आहे म्हणून कंपनी पुढील फोन यावर्षीच्या अखेरीस सादर करू शकते. तसेच यावेळी कंपनी भारतीय बाजाराला प्राधान्य देणार नाही असं दिसतंय.

इन्व्हर्स या टेक वेबसाईटशी बोलताना पेई यांनी कन्फर्म केलं आहे की, कंपनी नथिंग फोन (2) अमेरिकन बाजाराला प्राधान्य देण्याचा विचार करत आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की हा फोन भारतात येणार नाही तर हा फोन अमेरिकेत आधी लाँच केला जाईल. विशेष म्हणजे नथिंग फोन (1) अमेरिकेत अधिकृतपणे लाँच करण्यात आला नव्हता. हे देखील वाचा: 64MP Camera सह येतोय Vivo Y100 5G फोन; लाँच होण्याआधीच झाला किंमतीचा खुलासा

कार्ल पेई यांनी कंपनीचा आगामी फोन नथिंग फोन 2 नावानं येईल असं सांगितलं तसेच हा फोन अधिक प्रीमियम असेल, हे देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा फोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह ग्राहकांच्या भेटीला येईल, तसेच याची किंमत देखील वाढलेली दिसू शकते, असा अंदाज लावला जात आहे. आगामी काळात या फोनची अजून माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

Nothing Phone (1) स्पेसिफिकेशन्स

  • 6.55 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 50MP ड्युअल कॅमेरा, OIS
  • 4500mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा 10-bit OLED पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 2400×1080 पिक्सल रेजलूशन, HDR10+, 402PPI, आणि 1200 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरची ताकद मिळते. सोबतीला Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर

Nothing Phone (1) स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) आणि इलेक्ट्रिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) ला सपोर्ट करतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX766 सेन्सर आणि सेकंडरी कॅमेरा 50MP Samsung JN1 अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे. तसेच फोन 15W Qi वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here