Exclusive: iQOO ब्रँड मार्च मध्ये येईल भारतात, Vivo पासून वेगळा असेल हा ब्रँड

Vivo ने फेब्रुवारी 2019 मध्ये आपला सब-ब्रँड iQOO आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केला होता. हा ब्रँड सध्या घरच्या मार्केट मध्ये एक्टिव आहे. या ब्रँडच्या अंतर्गत सध्या पाच स्मार्टफोन्स चीन मध्ये विकले जात आहेत. तसेच iQOO 3 Neo आणि iQOO 3 येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कि कंपनी या मॉडेल्स वर काम करत आहे. 91mobiles ला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनी यावर्षी मार्च मध्ये भारतात IQOO ब्रँड सादर करण्याचे प्लॅनिंग करत आहे.

चीन मध्ये iQOO एक प्रीमियम ब्रँड आहे जो आपल्या फोन्स मध्ये शानदार परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे भारतात iQOO वेगळा ब्रँड म्हणून सादर केला जाण्याची शक्यता आहे.

भारतात कंपनी iQOO च्या अंतर्गत कोणता फोन सादर करेल याची माहिती मिळाली नाही. आशा आहे कि कंपनी या ब्रँडच्या आत पहिला फोन भारतीय मार्केट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 8xx-सीरीज फ्लॅगशिप चिपसेट सह सादर केला जाईल.

IQOO

काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि कंपनी iQOO सीरीज मध्ये iQOO 2 लॉन्च न करता थेट iQOO 3 सादर करेल. याआधी कंपनीने Nex सीरीज मध्ये असे केले आहे. कंपनीने Vivo NEX S नंतर Vivo NEX 3 सादर केला होता. नवीन iQOO फोन बद्दल बोलायचे आता हा मॉडेल नंबर V1950A सह 3C ऐजेंसी वर सर्टिफिकेशन मिळाले आहे. बोलले जात आहे कि हा अपकमिंग iQOO 3 स्मार्टफोन असेल.

3C सर्टिफिकेशन वर समोर आले होते कि Vivo V1950A 5G कनेक्टिविटी सह सादर केला जाईल. तसेच समोर आले आहे कि फोन 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. याव्यतिरिक्त स्मार्टफोनला चीनच्या MIIT ऑथोरिटी कडून अप्रूवल मिळाले आहे. या लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन 5G फ्रिक्वेन्सी बॅंड N1, N41, N78 आणि N79 सह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here