OnePlus Nord CE 3 Lite 5G झाला भारतात लाँच; फोनमध्ये 108MP कॅमेऱ्यासह 16GB रॅम

Highlights

  • हा फोन Snapdragon 695 चिपसेटसह भारतात आला आहे.
  • यात 8GB RAM सह 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.
  • OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 108MP ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो

आज वनप्लसनं भारतात आपल्या नॉर्ड सीरिज नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं OnePlus Nord CE 3 Lite 5G देशात सादर केला आहे. जो नॉर्ड सीई 2 लाइटची जागा घेईल. फोनमध्ये 16GB RAM (8GB+8GB), Snapdragon 695 चिपसेट, 108MP Camera, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

OnePlus Nord CE 3 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72” FHD+ LCD 120Hz Display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695
  • 108MP+2MP+2MP Camera
  • 67W 5,000mAh Battery

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी फोन 6.72 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा एक एलसीडी पॅनल आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 240हर्टज टच सॅम्पलिंग रेट, 680निट्स पिक ब्राइटनेस, 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. कंपनीनं यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा दिली आहे. हे देखील वाचा: 12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OPPO A1 5G चीनमध्ये लाँच; जाणून घ्या किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी 8GB LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंत UFS 2.2 storage सह आला आहे. यात वर्च्युअली 8GB अतिरिक्त रॅम मिळून एकूण 16GB रॅम पवार मिळवता येईल. यातील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजन ओएस 13 वर चालतो.

वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 7 एप्रिलला भारतात लाँच होईल POCO C51; 8 हजारांच्या आसपास असू शकते किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G ड्युअल सिम फोन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सीचा ऑप्शन मिळतो. स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा वनप्लस नॉर्ड सीई 3 लाइट 5जी 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन 8जीबी रॅमसह दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तर फोनचा 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. या फोनही विक्री 11 एप्रिलपासून सुरु होईल तसेच फोन Pastel Lime आणि Chromatic Gray कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here