iQOO Neo 8 सीरीज अखेरीस चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. ह्या लाइनअपमध्ये कंपनीनं iQOO Neo 8 आणि iQOO Neo 8 Pro सादर केला आहे. ही सीरीज लुक आणि फीचर्सच्या बाबतीत भरपूर शानदार आहे. खासियत पाहता कंपनीनं पहिल्यांदाच iQOO Neo series मध्ये फोटोग्राफीसाठी V1+ चिप आणि AI चा वापर केला आहे.
आयकू नियो 8 सीरीजची किंमत
iQOO Neo 8 च्या 12जीबी + 256जीबी व्हेरिएंटची किंमत RMB 2,499 (जवळपास 29,400 रुपये), 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत RMB 2,799 (जवळपास 32,900 रुपये) आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत RMB 3,099 (जवळपास 36,400 रुपये) आहे.
iQOO Neo 8 Pro च्या 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत RMB 3299 ( जवळपास 38,800 रुपये) आणि 16GB + 512GB व्हेरिएंट RMB 3599 (जवळपास 42,300 रुपये) आहे. ह्या दोन्ही फोन्सची विक्री चीनमध्ये 31 मेपासून सुरु होईल.
आयकू नियो 8 सीरीज चे स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले : iQOO Neo 8 सीरीजमध्ये 6.78-इंचाचा 1.5K अॅमोलेड डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 92.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 2800×1260 रिजोल्यूशन, 2160Hz PWM आणि पंच होल कटआउट सह देण्यात आला आहे.
प्रोसेसर : iQOO Neo 8 Pro मध्ये पावरसाठी नवीन Immortalis-G715 सह Dimensity 9200+ प्रोसेसरसह मिळतो. तर वॅनिला मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 आणि एड्रिनो जीपीयू देण्यात आला आहे.
रॅम आणि स्टोरेज : iQOO Neo 8 सीरीजमध्ये 16GB LPDDR5 RAM आणि 512GB UFS 4.0 पर्यंतच्या स्टोरेज असेल.
ओएस : iQOO Neo 8 सीरीज Origin OS 3.0 सह अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.
कॅमेरा : iQOO Neo 8 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP बोकेह लेन्स आहे तर iQOO Neo 8 Pro मध्ये 50MP Sony IMX866V चा मेन कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. तसेच दोन्ही फोन्समध्ये सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी : iQOO Neo 8 सीरीजमध्ये 120 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ह्यात USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे.
कनेक्टिव्हिटी : iQOO Neo 8 सीरीजमध्ये इन-डिस्प्ले सेन्सर आणि aptX, टाईप-सी ऑडियो, 5G, 4G LTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.3, जीपीएस, एनएफसी आणि USB टाइप-सी पोर्ट मिळतो.