आमच्या हाती लागली iQOO Neo 8 सीरीजची माहिती; या मीडियाटेक प्रोसेसरसह येऊ शकतात बाजारात

Highlights

  • iQOO Neo 8 आणि Pro लवकरच होऊ शकतात लाँच
  • यात मिळू शकते 5000mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • मीडियाटेकच्या दमदार प्रोसेसरसह येऊ शकतात बाजारात

iQOO Neo 7 सीरीजनंतर चिनी स्मार्टफोन कंपनी iQOO सध्या आगामी iQOO Neo 8 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. विवोच्या सब-ब्रँड आयकूच्या आगामी iQOO Neo 8 लाइनअप बद्दल बरीच माहिती समोर आली आहे. आता 91मोबाइल्स हिंदीला टिपस्टर पारस गुगलानीकडून काही एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सीरीजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन iQOO Neo 8 आणि iQOO Neo 8 Pro लाँच करू शकते. हे फोन्स यंदा मेच्या शेवटपर्यंत लाँच केले जाऊ शकतात.

iQOO Neo 8 सीरीजचे लीक स्पेसिफिकेशन्स

  • AMOLED डिस्प्ले पॅनल
  • 80W/100W फास्ट चार्ज
  • मीडियाटेक 9000 सीरीज प्रोसेसर

आयकूच्या आगामी फोनबद्दल पारस गुगलानीनं सांगितलं की iQOO Neo 8 स्मार्टफोनचा मॉडेल नंबर V2301 A (चायना) आणि iQOO Neo 8 Pro चा मॉडेल नंबर V2302A (चायना) असू असेल. तसेच कंपनीच्या आगामी फोनमध्ये AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल.

लीक झालेल्या माहितीनुसार, 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच Neo 8 मध्ये 80W आणि Pro मॉडेलमध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर टिपस्टरच्या मते, हा फोन मीडियाटेकच्या 9000 सीरीज प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. लाँच बद्दल टिपस्टरनं सांगितलं की आगामी फोन मे महिन्याच्या शेवटपर्यंत लाँच केला जाऊ शकतो.

iQOO Neo 8 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
  • 16GB पर्यंत रॅम

iQOO Neo 8 Pro बद्दल आधी देखील लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत. या फोन बाबत सांगितलं जात आहे की यात 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले पॅनल आणि 5,000mAh ची बॅटरी असू शकते. आयकूचा हा फोन MediaTek च्या Dimensity 9200+ प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB ची स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 13 वर आधारित FuntouchOS 13 वर चालू शकतो.

कॅमेरा स्पेक्स पाहता iQOO Neo 8 Pro मध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा असू शकतो, जोडीला अल्ट्रावाइड आणि टेलीफोटो कॅमेरा सेन्सर दिली जाऊ शकते. अंदाज लावला जात आहे की प्रायमरी कॅमेरा सेन्सर 1/1.5-इंचाचा असू शकतो. सध्या iQOO Neo 8 सीरीज बद्दल इतकीच माहिती उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here