जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन घेऊन येत आहे कंपनी, किंमत असेल 12,000 रुपयांपेक्षा पण कमी

iQOO ने अलीकडेच आपल्या गृह मार्केट चीन मध्ये iQOO Neo 5 स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो 12 जीबी रॅमसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटला सपोर्ट करतो. या फोननंतर आता आईक्यू अजून एक नवीन मोबाईल फोन टेक मार्केट मध्ये घेऊन येण्याची योजना बनवत आहे. बातमी समोर आली आहे की ही चीनी कंपनी एक नवीन फोन लवकरच सादर करेल जो iQOO U3x नावाने लॉन्च होईल. बोलले जात आहे आईक्यू यू3एक्स एक 5G रेडी फोन असेल जो लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

iQOO U3x 5G ची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यानुसार आईक्यू ब्रँड एक स्वस्त 5जी फोनवर काम करत आहे जो आईक्यू यू3एक्स नावाने लॉन्च केला जाईल. लीकनुसार हा फोन एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्ससह मार्केट मध्ये येईल. टिपस्टरनुसार या फोनची किंमत 1000 युआनच्या आसपास असेल. ही किंमत इंडियन करंसीनुसार 11,000 रुपयांच्या आसपास असेल. ही बातमी जर खरी ठरली तर iQOO U3x जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असेल.

iQOO U3x 5G बद्दल लीकमध्ये सांगण्यात आले आहे की हा में स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 चिपसेटला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर असतिल. तसेच पावर बॅकअपसाठी आईक्यू यू3एक्स 5जी फोन 5,000एमएएचची बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.

iQOO 5 Neo 5G
फोनची डिजाइन पाहता यात सिंगल सेल्फी कॅमेरा आहे, ज्यासाठी होल पंच कटआउट मध्यभागी देण्यात आला आहे. पंच-होलमुळे फोनच्या फ्रंटला तिन्ही कडा बेजललेस आहेत. तसेच, बॉटमला बारीक चिन पार्ट मिळतो. तसेच मागील लुक पाहता यात वर्टिकल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या सेटअपच्या खाली कंपनीची ब्रँडिंग आणि त्याखाली फोनचे नाव लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर ऑन-ऑफ बटन आहे.

iQOO 5 Neo 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.62-इंच (2400×1080 पिक्सल) फुल एचडी+ AMOLED 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेली स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच फोनचा डिस्प्ले HDR10+, 120Hz रिफ्रेश रेट, 105% NTSC कलर gamut, आणि 1,300 nits ब्राइटनेस सपोर्टसह काम करतो. तसेच, फोन ऑक्टा-कोर (1 x 3.2GHz + 3 x 2.42GHz + 4 x 1.8GHz Hexa) स्नॅपड्रॅगन 870 7nm मोबाईल प्लॅटफॉर्मची ताकद आहे. फोनमध्ये गेमिंगसाठी Adreno 650 GPU देण्यात आला आहे. तसेच डिवाइसमध्ये 8GB LPDDR5 रॅमसह 128GB (UFS 3.1) स्टोरेज आणि 8GB / 12GBLPDDR5 रॅमसह 256GB (UFS 3.1) स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे 48MP कॅमेरा IMX598 सेंसर, f/1.79 अपर्चर, एलईडी फ्लॅश आणि OIS सह येतो. तसेच फोनमध्ये f/2.2 अपर्चरसह 13MP चा 120° अल्ट्रा-वाइड सेंसर आणि f/2.4 अपर्चरसह 2MP मोनो सेंसर आहे. तसेच, वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये f/2.0 अपर्चरसह 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 66W सुपरफास्ट फ्लॅश चार्जसह 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये यूएसबी टाइप-सी ऑडियो, स्टीरियो स्पीकर, हाई-फाई ऑडियो 5G SA / NSA, डुअल 4G VoLTE, वाई-फाई 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.1 आणि GPS / GLONASS, USB टाइप- C सारखे पर्याय आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here