Redmi नं लाॅन्च केला पावरफुल Note 12 Turbo 5G फोन, PUBG सारख्या गेम्ससाठी ठरू शकतो मस्त ऑप्शन

Highlights

  • Redmi Note 12 Turbo 5G चीनमध्ये लाॅन्च झाला आहे.
  • हा फोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 वर चालतो.
  • हा मोबाइल को 3725mm vapour champer cooling सह येतो.

Redmi Note 12 Turbo 5G चीनमध्ये लाॅन्च झाला आहे. हा मोबाइल फोन 64MP Camera, 12GB RAM आणि Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसरसह आला आहे. intelligent frame stabilization आणि VC cooling सारख्या फीचर्समुळे हा फोन PUBG सारख्या गेम्ससाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. विशेष म्हणजे रेडमी नोट 12 सीरीजमधील हा सातवा डिवायस आहे. याआधी Redmi Note 12 5G, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ 5G भारतात तर Redmi Note 12 4G, Note 12 Pro Speed Edition आणि Explorer Edition बाहेरच्या देशांमध्ये आले आहेत.

रेडमी नोट 12 टर्बो 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ OLED 120Hz Display
  • 16GB RAM + 1TB Storage
  • Qualcomm Snapdragon 7+ Gen 2
  • 64MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 67W 5,000mAh Battery

Redmi Note 12 Turbo 5G 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फ्लेक्सिबल ओएलईडी डिस्प्लेसह लाॅन्च झाला आहे. फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते आणि 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, एचडीआर10+ सारख्या फीचर्ससह येते. पावर बॅकअपसाठी या रेडमी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 67वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनची थिकनेस फक्त 7.9एमएम आहे. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 8GB RAM च्या पावरसह TECNO SPARK 10 लाँच; फक्त 12,999 मध्ये 5जी फोन

रेडमी नोट 12 टर्बो 5जी फोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाॅन्च झाला आहे जो 2.91गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. गेमिंगसाठी या फोनमध्ये व्हेपर चेंबर कूलिंग टेक्नोलाॅजी देण्यात आली आहे. फोनमध्ये LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage मिळते. तर हा रेडमी मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी Redmi Note 12 Turbo 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा रेडमी मोबाइल 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5एमएम जॅक व एनएफसी सारखे फीचर्स मिळतात.

रेडमी नोट 12 टर्बो 5जी ची किंमत

Redmi Note 12 Turbo 5G चीनमध्ये चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाॅन्च झाला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत RMB 1,999 (जवळपास 23,880 रुपये) आहे. तसेच फोनचा 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 2,099 (जवळपास 25,100 रुपये) आणि 12जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 2,299 (जवळपास 27,450 रुपये) मध्ये मार्केटमध्ये आला आहे. हे देखील वाचा: सामान्य नागरिकांना दिलासा! पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढली

रेडमी नोट 12 टर्बो 5जी च्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 16जीबी रॅम + 1टीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत RMB 2,599 म्हणजे 31,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन ice feather white, star sea blue आणि carbon fiber black कलरमध्ये लाॅन्च झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here