iQOO Z8 फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 5000mAh बॅटरी, Dimensity 8200 चिपसेटचा खुलासा

Highlights

  • मिड रेंज सेगमेंटमध्ये नवीन iQOO फोन सादर करू शकते.
  • ह्यात 144Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो.
  • 120W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

iQOO आपल्या Z-सीरीजचा विस्तार करू शकते. असं सांगितलं जात आहे की कंपनी iQOO Z8 स्मार्टफोन घेऊन येऊ शकते. फोनबद्दल गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु आहे. तर, आता ह्या फोनचं अजून एक नवीन लीक समोर आलं आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. तुम्ही ह्या पोस्टमध्ये नवीन मोबाइलची माहिती वाचू शकता.

iQOO Z8 स्मार्टफोन (लीक)

iQOO Z8 मोबाइल बद्दल डिजिटल चॅट स्टेशनकडून लीक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारतातील प्रमुख टिपस्टर अभिषेक यादव यांनी देखील माहिती शेयर केली आहे. असं देखील बोललं जात आहे की डिवाइस कंपनी मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करू शकते. तसेच सर्वप्रथम हा स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये लाँच होईल. त्यानंतर ह्याची एंट्री इतर बाजारांमध्ये केली जाऊ शकते.

iQOO Z8 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : फोनच्या डिस्प्ले साइज बाबत माहिती मिळाली नाही परंतु ह्यात युजर्सना 144hz रिफ्रेश रेट असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो.
  • प्रोसेसर : दमदार परफॉर्मन्ससाठी कंपनी Dimensity 8200 प्रोसेसरचा वापर करू शकते.
  • स्टोरेज : स्मार्टफोनमध्ये LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 टेक्नॉलॉजीसह इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकते.
  • बॅटरी : हा फोन 2440mAh ड्युअल सेल बॅटरीसह येऊ शकतो. म्हणजे दोन्ही मिळून फोनमध्ये सुमारे 5000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
  • कॅमेरा : डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. परंतु ह्यातील सेन्सर्सची माहिती मात्र मिळाली नाही.
  • अन्य : डिवाइसमध्ये हीटिंग कमी करण्यासाठी कूलिंग टेक्नॉलॉजी, ड्युअल सिम 5G, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स मिळू शकतात.
  • ओएस : हा लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here