iQOO Z9, iQOO Z9x, iQOO Z9 Turbo स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन आले समोर, जाणून घ्या माहिती

मोबाईल ब्रँड आयक्यू Z9 सीरिज 24 एप्रिलला चीनमध्ये लाँच होणार आहे. यानुसार तीन फोन iQOO Z9, iQOO Z9x आणि iQOO Z9 Turbo येऊ शकतात. परंतु अजून ब्रँडने फक्त टर्बो मॉडेलचा लाँच कंफर्म केले आहे, परंतु याआधी टिपस्टर इशान अग्रवालच्या माध्यमातून 91 मोबाईलला सीरिजचे तिन्ही फोनची माहिती मिळाली आहे. तसेच नवीन लीकमध्ये संपूर्म स्पेक्स शीट समोर आली आहे. चला, पुढे माहिती सविस्तर जाणून घेऊया.

iQOO Z9 सीरिज स्पेसिफिकेशन (लीक)

  • डिझाईन: सीरिजच्या तिन्ही मध्ये iQOO Z9x 199 ग्रॅम असू शकतो तर इतर दोन मॉडेल 195 ग्रॅम वजनाचे सांगितले गेले आहेत. तसेच iQOO Z9, iQOO Z9x आणि iQOO Z9 Turbo मध्ये प्लास्टिक बॅक दिले जाऊ शकते.
  • डिस्प्ले: iQOO Z9x मध्ये 6.72-इंचाची 120Hz रिफ्रेश रेट असणारी LCD स्क्रीन असू शकते तर iQOO Z9 आणि iQOO Z9 Tubro मध्ये 6.78-इंचाचा 144Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED पॅनल मिळू शकतो.
  • कॅमेरा: iQOO Z9 आणि Z9x मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स लावला जाऊ शकतो. तर टर्बो मॉडेलमध्ये पोर्ट्रेट लेन्स व्यतिरिक्त सेकंडरी सेन्सरच्या रूपामध्ये 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स असू शकते. तसेच, सेल्फीसाठी iQOO Z9x मध्ये 8MP कॅमेरा आणि iQOO Z9 आणि टर्बो मॉडेलमध्ये 16MP कॅमेरा मिळू शकतो.

  • प्रोसेसर: iQOO Z9x मध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट सादर केली जाऊ शकते. तर Z9 मॉडेल Snapdragon 7 Gen 3 चिपसेट असू शकते. तसेच Z9 Turbo मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8एस जेन 3 चिप दिली जाऊ शकते.
  • मेमरी: iQOO Z9x आणि Z9 मध्ये LPDDR4X रॅम आणि UFS 2.2 स्टोरेजची सुविधा असू शकते, तर टर्बोमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 स्टोरेज मिळण्याची चर्चा आहे.
  • बॅटरी: तिन्ही फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच, चार्जिंग स्पीड पाहता iQOO Z9 आणि iQOO Z9 Turbo मध्ये 80 वॉट तो iQOO Z9x मध्ये फक्त 40W चार्जिंग स्पीड मिळू शकते.
  • इतर: iQOO Z9x मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5 मिमी ऑडियो जॅक असू शकतो. तर Z9 आणि Z9 Turbo मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, IR ब्लास्टर आणि NFC फिचर्स दिले जाऊ शकतात.
  • सॉफ्टवेअर: या सीरिजचे तिन्ही मोबाईल अँड्रॉईड 14 आधारित ओरिजिनओएस 4 वर आधारित ठेवले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here